(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
“मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अक्षय कुमारची ‘धांसू’ एन्ट्री
चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने त्याच्या लाडक्या फ्रँचायझी ‘गोलमाल ५’ चे शूटिंग सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी, त्याने त्याच्या जुहू येथील घरी चित्रीकरण सुरु केले आहे. आणि आता, १४ मार्च रोजी दिग्दर्शकाने स्वतःच्या ५२ व्या वाढदिवशी, त्याने सेटवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला. शनिवारी, रोहितने सेटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये मुख्य कलाकार अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि तुषार कपूर हे दिसत आहेत.
तसेच, व्हिडिओमध्ये अजय एका सरप्राईजचा इशारा देतो, त्यानंतर पहिल्या चित्रपटात लक्ष्मण प्रसाद शर्माची भूमिका करणारा शर्मन जोशी पुन्हा कलाकारांमध्ये सामील होताना दिसला आहे. पण अजय म्हणतो की, ‘खरे सरप्राईज अजून बाकी आहे. खरा सरप्राईज असे म्हणताच अक्षय कुमार टक्कल पडलेल्या लूकमध्ये भव्य एन्ट्री करताना दिसला आहे. व्हिडिओमध्ये अक्षय आणि अजय एक मजेदार क्षण शेअर करताना दिसले आहेत, जिथे अक्षय अजयच्या गालावर खेळकरपणे चुंबन घेतो आणि रोहित शेट्टीला गोंधळात टाकतो. नंतर, अक्षयसह संपूर्ण टीम ग्रुप फोटोसाठी पोझ देताना या व्हिडिओमध्ये दिसले आहेत.
Vicky Kaushal ने गाजवला ‘Zee Cine Awards’चा मंच; हत्तीवरून एन्ट्री करत मराठा शौर्याला दिली मानवंदना
रोहित शेट्टीचे हटके कॅप्शन
बीटीएस व्हिडिओ शेअर करताना रोहित शेट्टीने लिहिले, “२० वर्षांपूर्वी पहिला गोलमाल प्रदर्शित झाला होता आणि त्याने माझे आयुष्य बदलले. याचे सर्व श्रेय तुम्हाला, प्रेक्षकांना जाते. गेल्या २० वर्षांत आम्ही तुम्हाला हसवले आहे, कधीकधी निराश केले आहे, परंतु नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे. आता, मी आणि माझी अद्भुत टीम पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘गोलमाल ५’ चे शूटिंग सुरू झाले आहे. आम्हाला नेहमीच तुमचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत. चित्रपटगृहांमध्ये लवकरच भेटूया.” असे लिहून रोहित शेट्टीने ही झलक चाहत्यांना दाखवली आहे. तसेच आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






