सोनिया गांधी यांचे मनेका गांधीबाबत खुलासे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सोनिया गांधी यांनी लिहिले की, ‘१९७३ च्या अखेरीस, संजय गांधी त्यांच्या शाळकरी मित्राच्या साखरपुड्यात मनेका आनंद यांना भेटले. मनेका संजयपेक्षा १० वर्षांनी लहान होत्या. त्या एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी होत्या, त्यांनी एलएसआर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते आणि काही काळ मॉडेलिंगही केले होते. त्यांच्या नात्याला काही दिवसच झाले असताना, सोनिया यांनी इंदिरा गांधींना सांगितले की ते लग्नाचा विचार करत आहेत.
इंदिरा यांना आश्चर्य वाटले कारण संजयने यापूर्वी आपल्या मैत्रिणींची ओळख कुटुंबाला करून दिली होती, पण ते पहिल्यांदाच लग्नाबद्दल चर्चा करत होते, आणि तेही त्यांच्या नात्याला सुरुवात झाल्यानंतर इतक्या लवकर. इंदिरा यांनी संजयला थांबायला सांगितले. मनेका त्यावेळी अल्पवयीन होत्या, त्यामुळे लग्नासाठी त्यांना १८ वर्षांचे होणे आवश्यक होते.’
सोनिया गांधी यांनी पुस्तकात पुढे लिहिले की, “इंदिरा यांना भीती होती की दोघांमधील वयाच्या फरकामुळे त्यांच्या जुळवून घेण्यात अडचणी येतील. पण त्याहून अधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे त्यांना मिळालेली माहिती. मनेकाची आई, अमतेश्वर आनंद, संजयवर लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी दबाव टाकत होत्या. इंदिरा यांनी संजयच्या एका जवळच्या मित्राकडून या माहितीची खात्री केली होती’
संजयच्या आग्रहानंतर, त्या दोघांचा लवकरच साखरपुडा झाला आणि सप्टेंबर १९७४ मध्ये त्यांचे लग्न झाले. सोनिया यांच्या मते, ‘मनेका खूप उत्साही, बोलकी आणि उत्साहाने भरलेली मुलगी होती. घरात अशी वहिनी असणे खूप दिलासादायक होते. तिचे बोलणे ऐकायला मला खूप आवडायचे. प्रियांकासुद्धा अनेकदा मनेकाच्या खोलीत तिच्या गोष्टी ऐकताना आढळायची. पण हळूहळू, घरातील वातावरण बदलू लागले आणि चिडचिड सुरू झाली.’
सोनियाने लिहिले की, ‘घरी मला ‘बहुरानी’ म्हटले जायचे आणि मनेका माझ्या धाकट्या भावाची पत्नी असल्याने तिला ‘छोटी बहुरानी’ म्हटले जायचे. माझ्यासाठी आम्ही दोघीही घराच्या मुली होतो आणि आमचा दर्जा समान होता. पण मनेकाला कदाचित हे अपमानकारक वाटत असावे. कधीकधी, जेव्हा ती उद्धटपणे बोलायची, तेव्हा शांतता राखण्यासाठी मी गप्प राहायचे. पण जेव्हा मला वाटायचे की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत, तेव्हा मी गप्प न बसता प्रत्युत्तर द्यायचे.’
सोनिया यांनी संजय आणि मनेका यांच्या नात्यातील मतभेदही या पुस्तकात पुढे लिहिले आहेत. ‘जेव्हा संजय आणि मनेका मोठ्याने, रागाने बोलायचे, तेव्हा त्यांच्यातील मतभेद स्पष्ट दिसू लागले. मनेका रागावल्यावर, ती इंदिरा गांधींसमोरही शिवीगाळ करायची. सामाजिकदृष्ट्या जुळवून घेणाऱ्या स्वभावाच्या एका तरुण मुलीसाठी एकत्र कुटुंबात राहणे कठीण गेले असेल. संजय त्याच्या कार प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. इंदिरा गांधी दिवसभर काम करायच्या. राजीव पायलट होता आणि मी घरकाम आणि मुलांमध्ये व्यस्त होते. आमचे घर तिला कंटाळवाणे आणि जास्तच शिस्तबद्ध वाटले असेल. नंतर, मनेका संजयसोबत राजकीय कार्यक्रमांना जाऊ लागली आणि तिचे वागणे काही प्रमाणात स्थिर झाले. मनेकाने ‘सूर्या’ नावाचे एक मासिक सुरू केले, ज्यात तिची आई संचालक होती आणि मनेका संपादक होती.’
Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण
सोनिया यांच्या मते, आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या वागणुकीमुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते. संजय गांधींवर मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप होता. दरम्यान, इंदिरा गांधींना मनेकाच्या भूमिकेबद्दल चिंता वाटत होती. संजयला शांत करण्याऐवजी, मनेका त्याच्या कृतींना प्रोत्साहन देत असे आणि अनेकदा त्यात सहभागीही होत असे. सोनिया पुस्तकात लिहितात की, इंदिरा गांधींनी तत्कालीन कॅबिनेट सचिव पी. एन. धर यांना मनेकाबद्दल सांगितले होते, ‘तिला आतापासूनच पंख फुटू लागले आहेत.’
आता सोनिया यांच्या या खुलाशानंतर मनेका गांधी यांचं काय वक्तव्य असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण मनेका गांधी हेदेखील राजकारणतील एक मोठं नाव असल्याने अशा पद्धतीने पुस्तकात झालेल्या खुलाशाने कदाचित त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो.
Ans: बिलॉन्गिंग : ए जर्नी ऑफ लव’ हे सोनिया गांधी यांच्या पुस्तकांचं नाव आहे
Ans: हे राजकारणाबाबत नाही तर खासगी आयुष्याबाबत पुस्तक असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं आहे
Ans: मनेका गांधी या सोनिया गांधी यांच्या लहान जाऊबाई आहेत






