Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Furious: ‘धुरंधर’ला खाऊन टाकेल असा हा थ्रिलर स्पाय चित्रपट; ट्रेलरनेच दिली ‘ॲनिमल’ आणि ‘मार्को’ला टक्कर

तुम्ही ॲक्शन चित्रपटांचे शौकीन असाल, तर हा चित्रपट चुकवू नकाच. 'द फ्युरियस' या हाँगकाँग ॲक्शन चित्रपटाचा ट्रेलर तुमच्या अंगावर काटा आणेल. हा ट्रेलर 'ॲनिमल' आणि 'धुरंधर' सारख्या चित्रपटांनाही टक्कर देणारा आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 11:51 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर’ला खाऊन टाकेल हा थ्रिलर स्पाय चित्रपट
  • ट्रेलरनेच दिली ‘ॲनिमल’ आणि ‘मार्को’ला टक्कर
  • काय आहे या चित्रपटाचे नाव?
 

सध्या सिनेमाक्षेत्रात अ‍ॅक्शन चित्रपटांचा जोरदार ट्रेंड पाहायला मिळत आहे. केवळ भारतीय सिनेमातच नव्हे, तर जागतिक सिनेमातही भेदक आणि थरारक अ‍ॅक्शनची स्पर्धा सुरू आहे. आतापर्यंत ‘मार्को’, ‘ॲनिमल’ आणि ‘धुरंधर’ यांसारख्या चित्रपटांचा विध्वंसक अ‍ॅक्शनसाठी उल्लेख केला जात होता. मात्र आता एक असा चित्रपट येत आहे, जो पाहिल्यानंतर या सर्व चित्रपटांतील अ‍ॅक्शन तुम्ही विसरून जाल.

हा चित्रपट भारतातील अनेक अ‍ॅक्शन हिरोंची झलक आपल्या आत सामावून घेणार आहे. तसेच, हाँगकाँगच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपट ‘द फ्यूरियस’बद्दल बोलत आहोत. सध्या या चित्रपटाचा ट्रेलरच प्रदर्शित झाला आहे, मात्र त्यातील अ‍ॅक्शनमुळे तो सतत चर्चेत राहिला आहे.

आता विवेक अग्निहोत्री साधणार पाकिस्तानवर निशाणा; ‘Operation Sindoor’ वर दिग्दर्शक घेऊन येणार चित्रपट

ट्रेलरमध्ये दिसली चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा वेई (शी) याच्याभोवती फिरते, जो आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी टोळीने अपहरण केलेल्या आपल्या मुलीच्या शोधात आहे. वेईला नवीन (तस्लीम) मदत करतो, जो स्वतः अनेक रहस्ये बाळगणारा पत्रकार आहे. दोघे मिळून वेईच्या मुलीला वाचवण्यासाठी गुन्हेगारी जगाशी दोन हात करतात. २ मिनिटे ६ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये इतकी क्रूरता आणि भीषणता दाखवण्यात आली आहे की, ‘ॲनिमल’मधील रणविजय आणि ‘धुरंधर’मधील हमजा आणि रहमान डाकू यांची क्रूरता देखील तुलनेने सौम्य वाटेल. या चित्रपटातील अ‍ॅक्शन एक-दोन नव्हे तर दहा ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांनाही भारी पडेल, असे म्हणता येईल.

ट्रेलरमधील अनेक दृश्ये पाहून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. केवळ आपल्या भीषण अ‍ॅक्शनमुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सध्या फक्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून ‘द फ्यूरियस’ हा चित्रपट २९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रणवीर सिंहचा पगडी घालून सिगारेट ओढतानाचा फेक व्हिडिओ व्हायरल; ‘धुरंधर’ दिग्दर्शकचा संताप, केला कारवाईचा इशारा

चित्रपटाची स्टारकास्ट

केनजी तानिगाकी दिग्दर्शित या चित्रपटात चिनी अभिनेता शी मियाओ आणि इंडोनेशियन स्टार जो तस्लीम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच कलाकारांमध्ये इंडोनेशियाच्या अ‍ॅक्शन चित्रपटांची स्टार यायान रुहियान आणि थाई अभिनेत्री यानिन विस्मितानंदा यांचाही समावेश आहे.

दिग्दर्शक म्हणून केनजी तानिगाकी यांचा हा केवळ तिसरा चित्रपट असला तरी हाँगकाँग सिनेमात त्यांना दिग्गज मानले जाते. त्यांनी ‘फ्लॅश पॉइंट’, ‘हिडन मॅन’, ‘रेजिंग फायर’ आणि ‘ट्वायलाइट ऑफ द वॉरियर्स: वॉल्ड इन’ यांसारख्या चित्रपटांवर काम केले आहे. याशिवाय हॉलीवूड चित्रपट ‘ब्लेड II’ साठी त्यांनी स्टंट कोऑर्डिनेटर आणि फाइट कोरिओग्राफर म्हणूनही काम पाहिले आहे.

 

 

Web Title: Hong kong action film the furious releases most brutal trailer after it you forget dhurandhar animal and marco

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hollywood

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक
4

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.