Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Housefull 5’ ने मागील चार भागांचा मोडला रेकॉर्ड, ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा केला पार!

अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच भरपूर चर्चा करत आहे. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत प्रचंड कमाई केली आहे आणि मागील चार भागांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 10, 2025 | 12:11 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सोनम बाजवा, जॅकलिन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्यासह २० कलाकारांचा अभिनय असलेला ‘हाऊसफुल ५’ हा कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आपली जादू दाखवत आहे. हा चित्रपट ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि अवघ्या चार दिवसांतच १०० कोटींच्या क्लबमध्ये त्याने चांगली कमाई केली आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे ‘हाऊसफुल ५’ ने सनी देओलचा विक्रम मोडला आहे. यासह, चित्रपटाने स्वतःच्या मागील फ्रँचायझीचा म्हणजेच चारही भागांचा विक्रम मोडला आहे. ‘हाऊसफुल ५’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाकूया.

‘हाऊसफुल ५’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमारचा मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ थिएटरमध्ये जबरदस्त जादू दाखवत आहे. तथापि, चौथ्या दिवशी, इतर तीन दिवसांच्या तुलनेत त्याच्या कमाईत मोठी घट झाली आहे. असे असूनही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘हाऊसफुल ५’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १३.५० कोटी रुपये कमावले आहेत.

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करचा पहिला व्लॉग समोर, नणंद सबा म्हणाली ‘हा काळ खूप कठीण…’

इतर दिवसांच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, पहिल्या दिवशी चित्रपटाने २४ कोटी रुपये कमावले आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी ३१ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ३२.५ कोटी रुपये कमावले. यासह, ‘हाऊसफुल ५’ची एकूण कमाई १०१ कोटी रुपये झाली आहे.

 

ब्रेकअपच्या चर्चा, मध्येच पॅचअप अन् खास फोटोशूट; तेजस्वी प्रकाश- करण कुंद्राच्या नात्यातला अनोखा ट्वीस्ट

‘हाऊसफुल ५’ ने त्याच्या मागील चार भागांचा विक्रम मोडला आहे. ‘हाऊसफुल ४’ ने बॉक्स ऑफिसवर ८७.७८ कोटी रुपये कमावले होते. तर ‘हाऊसफुल ३’ ने ६१.५३ कोटी रुपये कमावले होते, तर ‘हाऊसफुल २’ आणि ‘हाऊसफुल’ ने बॉक्स ऑफिसवर ४६.२३ कोटी रुपये आणि ३७ कोटी रुपये कमावले होते. ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या चारही भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामध्ये २० कलाकार असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट चांगलाच उतरला आहे.

Web Title: Housefull 5 box office collection akshay kumar movie beat all series of housefull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
2

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण
3

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.