Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी माथेरानच्या ग्रामदैवत श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन घेतले आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 03, 2026 | 12:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

जॅकी श्रॉफ यांचा साधेपणा आणि परंपरेशी असलेलं नातं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ते दरवर्षीप्रमाणे माथेरान येथे पोहोचले. येथे त्यांनी ग्रामदैवत श्री पिसारनाथ मंदिर येथे जाऊन अभिषेक करत दर्शन घेतलं. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा कायम ठेवली असून, प्रत्येक महत्त्वाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ते येथे येऊन देवदर्शन घेतात.

सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. श्रावण महिन्यातदेखील कितीही व्यस्तता असली तरी माथेरानला भेट देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. केवळ दर्शनच नाही, तर इथल्या स्थानिकांशी जुळलेलं नातंही ते तितक्याच आपुलकीने जपतात.

सुरभी ज्योतीने वयाच्या 37 व्या वर्षी दिला जुळ्या बाळांना जन्म; प्रेग्नन्सी गोड बातमी शेअर करत चाहत्यांना दिले सरप्राईज

यावेळी त्यांनी शार्लेट लेक परिसरात फेरफटका मारत आपल्या जुन्या मित्रांना भेट दिली. येथील प्रसिद्ध ‘कदम टी स्टॉल’वर जाऊन त्यांनी चहा आणि बटाटा वड्याचा आस्वाद घेतला. चंद्रा बग, मेघा बग आणि पित्रा बग यांच्यासोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्थानिकांच्या मते, मोठे स्टार असूनही जॅकी श्रॉफ कधीही व्हीआयपी वागणूक घेत नाहीत, तर सर्वांशी अगदी साधेपणाने संवाद साधतात.

माथेरानमध्ये पूर्वी पायी चालण्याची परंपरा असताना जॅकी श्रॉफ यांनीही ती जपली होती. या प्रवासातूनच त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला, जो त्यांनी आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. स्थानिक टॅक्सी चालक किशोर भोईर यांनी सांगितले की, जॅकी श्रॉफ यांनी नेरळ ते माथेरान दरम्यानच्या जंगलातील प्राणी-पक्ष्यांच्या पाण्याच्या समस्येबाबतही पुढाकार घेतला असून, ती सोडवण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. एकंदरीत, स्टारडमच्या शिखरावर असूनही जॅकी श्रॉफ यांनी जपलेला साधेपणा, परंपरा आणि माणुसकी यामुळेच ते आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहेत.

भारत माता चित्रपटगृहात ‘सुपर डुपर’चा भव्य प्रीमियर; 6 वर्षांनंतर थिएटरचा दिमाखदार पुनरागमन सोहळा

सध्या माथेरान मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाल्या आहेत, मात्र पूर्वी पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी टॅक्सी स्टँड येथे उतरून पायी चालत जाऊन शार्लेट लेक येथे जाऊन दर्शन घेण्याची सुरू केलेली परंपरा जपली होती. त्याचा फायदा मोठा मित्र परिवार जॅकी यांचा माथेरान मध्ये निर्माण झाला आणि तो मित्र परिवार टिकवून ठेवण्याचे काम जॅकी यांनी कायम ठेवले आहे.

Web Title: Jackie shroff visits matheran pisarnath temple enjoys vada pav with locals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Jackie Shroff

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.