Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जहान कपूरने पटकावला IMDb स्टारमीटर पुरस्कार; ‘ब्लॅक वॉरंट’ वेब सिरीजने जिंकले चाहत्यांचे मन!

जहान कपूरला 'ब्लॅक वॉरंट' या चित्रपटासाठी IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाला आहे. जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणाऱ्या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 06, 2025 | 04:47 PM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb द्वारे IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार हा ‘ब्लॅक वॉरंट’ मधील अभिनेता जहान कपूरला देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. IMDb app वर प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या परफॉर्मरला या पुरस्काराद्वारे मान्यता दिली गेली आहे. जगभरातून IMDb वर येणा-या आणि दर महिन्याला 25 कोटींहून अधिक असलेल्या विजिटर्सच्या पेज व्ह्यूजद्वारे ही यादी तयार केली जाते. ही यादी अशा अभिनेत्यांबद्दल अचूक भाकीत करणारी ठरली आहे ज्यांच्या करिअरमध्ये अतिशय महत्त्वाचा क्षण आलेला आहे.

धक्कादायक! दादासाहेब फाळके पुरस्कार घोटाळा उघडकीस; संस्थापक अनिल मिश्रा आणि त्यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल!

कपूरने विक्रमादित्य मोटवानीच्या तुरुंगातील नाट्य असलेल्या ब्लॅक वॉरंटमधील अभिनयाद्वारे आपली छाप सोडली आहे. त्यामध्ये त्याने दिल्लीतील तिहार जेलमधील माजी सुपरइंटेंडंट सुनील कुमार गुप्ता ह्यांचे प्रत्यक्षातील जीवन पडद्यावर साकारले होते. थरारक मांडणी आणि लक्षवेधी अभिनयामुळे नावाजल्या गेलेल्या ह्या मालिकेला जगभरातील चाहत्यांनी उचलून धरले आहे. IMDb ग्राहकांनी त्याला 8.0/10 रेटिंग दिले आहे. ह्या शोच्या यशानंतर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये कपूर तीन वेळेस टॉप 10 मध्ये गेला होता. आणि दोन आठवड्यांपूर्वी त्याने सर्वोच्च स्थानही पटकावले होते. कपूरच्या आधीच्या क्रेडीटसमध्ये फराज़चा समावेश आहे. 2022 मध्ये आलेला तो त्याचा पहिल्या पदार्पणाचा चित्रपट होता.

“ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याबद्दल जहान कपूरने आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की, “IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा माझा पहिलाच पुरस्कार आहे असे नाही तसेच हे चाहत्यांनी मला दिला आहे. हे फार स्पेशल आहे, कारण हा पुरस्कार तुम्हा सर्वांमुळे मिळाला आहे. आम्ही जे काम केले, ते लोकांना रिलेट झाले आणि प्रत्येकाला माझ्याबद्दल अधिक माहिती घ्यायची होती. हे अतिशय उत्साहवर्धक आहे.” असे अभिनेत्याने या मुलाखतीत म्हटले आहे.

Ishika Taneja: आणखी एका अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडून घेतला संन्यास, लोक म्हणाले – “दुसरी ममता कुलकर्णी”

जहान कपूर ही कपूर कुटुंबातील आहे
जहान कपूर हा फिल्म इंडस्ट्रीतील कपूर घराण्यातील एक आहे. प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांचे लग्न जेनिफर केंडलशी झाले होते, त्यांना करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत. जहान हा कुणाल कपूरचा मुलगा आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘फराज’ या चित्रपटातून त्याने फिल्मी दुनियेत प्रवेश केला. आता ‘ब्लॅक वॉरंट’ मधून त्याने ओटीटीच्या जगात प्रवेश केला आहे. चाहते या त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

Web Title: Jahan kapoor wins imdb starmeter award black warrant web series wins fans hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • entertainment
  • Netflix India
  • OTT Release

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
3

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
4

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.