(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे अभिनेते परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाला सध्या तीव्र विरोध होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, या चित्रपटात इतिहासाचे मोडतोड करून चित्रीकरण करण्यात आले आहे असा आरोप वकील शकील अब्बास यांनी केला आहे.
याचिकाकर्त्याचा दावा आहे की हा चित्रपट ताजमहल आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करतो, ज्यामुळे जनतेमध्ये भ्रम निर्माण होऊ शकतो आणि धार्मिक तसेच साम्प्रदायिक तणाव वाढू शकतो.
वकील शकील अब्बास यांनी या याचिकेत आरोप केला आहे की, चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आली आहे.दरम्यान, भाजपातील नेते रजनीश सिंह यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच सीबीएफसीकडे तक्रार दाखल करून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.त्यांचा दावा आहे की हा चित्रपट त्यांच्या हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेच्या विषयावर आधारित आहे.
बिग बींच्या पायाला स्पर्श केल्यामुळे दिलजीतला खलिस्तानी गटाने धमकावले; गायकाने आगामी कॉन्सर्ट केला रद्द
रजनीश सिंह यांनी २०२२ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल केली होती.या याचिकेत त्यांनी ताजमहालमधील बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची मागणी केली होती.त्यांचा दावा होता की ताजमहाल ज्या जागी बांधले गेले आहे, त्या ठिकाणी मूळतः एक प्राचीन मंदिर होते.
योगिता चव्हाणनंतर आणखी एक टीव्ही अभिनेत्री घेणार डिवोर्स? लग्नाच्या 8 वर्षांनी घेतला मोठा निर्णय
रजनीश सिंह यांनी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मी ताजमहलमधील २२ खोल्या उघडण्याची जनहीत याचिका दाखल केली होती. माझा उद्देश इतकाच होता की, यामध्ये पारदर्शकता असावी आणि ऐतिहासिक तथ्य काय आहेत? ते सर्वांसमोर यावेत. मला कळले की, द ताज स्टोरी चित्रपट माझ्या याचिकेवर बेतलेला आहे. चित्रपटाच्या पोस्टर, प्रचाराचे साहित्य आणि चित्रपटाच्या कथेमध्ये हा चित्रपट न्यायालयीन याचिकेवर बेतलेला असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाचा हा दावा दिशाभूल करणारा आहे. तसेच माझ्या बौद्धिक आणि कायदेशीर हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच हे करण्यापूर्वी माझी परवानगी घेतलेली नाही, असाही आरोप त्यांनी केला.






