Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गहिरी गुपीते आणि गहिरा अपराधीभाव…’कानखजुरा’ ट्रेलर देतो न विसरता येणाऱ्या भूतकाळाची ग्वाही!

सोनी लिव्‍ह आता लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता 'कानखजुरा' ही खतरनाक वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 22, 2025 | 01:22 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

सोनी लिव्हची कानखजुरा ही वेबसीरिज एका पछाडणाऱ्या कथेची झलक प्रेक्षकांना घडवणार आहे. या गोष्टीत शांतता फसवी आहे आणि नजरेआड लपलेल्या बाबी डोळ्याला दिसणाऱ्या बाबींहून खूपच घातक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने एका अनोख्या जगाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या जगात अपराधीभाव पाठ सोडत नाही, रहस्ये उकळत राहतात आणि भूतकाळ सूड उगवतो. हे सगळं या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मॅगपाय या समीक्षकांनी नावाजलेल्या इझ्रायली मालिकेचे भारतीय रूपांतर ‘कानखजुरा’ मालिका मूळ कथेला एका वेगळ्या रूपात सादर करत आहे. या कथेत दोन दुरावलेल्या भावांमधील नात्याचा वेध घेण्यात आला आहे.

‘कानखजुरा’ या मालिकेमध्ये दोन विभक्‍त झालेल्‍या भावंडांना गडद भूतकाळाचा सामना करण्‍यास भाग पाडले जाते, जेथे ते जुन्‍या आठवणी आणि वास्‍तविकतेमधील संबंध शोधण्‍याचा प्रयत्‍न करतात. स्‍वत:च्‍या जुन्‍या आठवणींमुळे तुम्‍ही कधीच सुटका न होऊ शकणाऱ्या जाळ्यामध्‍ये अडकल्‍यास काय घडते हे सगळं या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

सलमान खानचा जीव पुन्हा धोक्यात? अज्ञात व्यक्तीकडून इमारतीत घुसखोरी

 

या मालिकेबद्दल आशूची भूमिका साकारणारा रोशन मॅथ्‍यू म्‍हणाला, ”सिरीज ‘कानखजुरा’ने माझे लक्ष वेधून घेतले, ज्‍यासाठी कारण म्‍हणजे कथानकामधील भावनिक प्रखरता आणि गोंधळादरम्‍यानची शांतता या मालिकेत दिसणार आहे. आशूची भूमिका लक्षवेधी आहे. जो क्षणोक्षणी भावूक होतो, पण त्‍याच्‍या शांत स्‍वभावापलीकडे मोठे वादळ लपलेले आहे. कथानक हृदयस्‍पर्शी आणि भयानक आहे. सिरीजमधील प्रत्‍येक नातेसंबंधामध्‍ये काही-ना-काही गुपित आहे आणि पात्रं याच गुपितांसह पुढे जातात, ज्‍यामुळे ही सिरीज अत्‍यंत धमाल आणि रोमांचक आहे.”

Cannes 2025 मध्ये फाटलेला ड्रेस का घालून आली उर्वशी रौतेला? अभिनेत्रीने सांगितले खास कारण!

अजय राय यांची निर्मिती आणि चंदन अरोरा दिग्‍दर्शित सिरीज ‘कानखजुरा’मध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे मोहित रैना, रोशन मॅथ्‍यू, साराह जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्र हल्‍दर, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी हे सगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रख्‍यात इस्रायली सिरीज ‘मॅग्‍पी’वर आधारित ही सिरीज येस स्‍टुडिओजच्‍या परवान्‍यांतर्गत क्रिएटर्स आदम बिझान्‍स्‍की, ओमरी शेनहार आणि डाना एडेन यांच्‍याद्वारे हिंदी रुपांतरित करण्‍यात आली आहे. डोना आणि शुला प्रॉडक्‍शन्‍सद्वारे निर्मित ही मालिका आहे. या सिरीजचे कथानक विभक्‍त झालेली कुटुंबं, विश्‍वासघात आणि दोष आणि जगण्‍यामधील लहान, भावूक क्षणांचा शोध घेते. ‘कनखजुरा’ ही मालिका ३० मे पासून फक्‍त सोनी लिव्‍हवर दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Kankhajura trailer roshan andrews mohit raina play brothers with mysterious dark past

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT Release
  • Sony Liv

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.