(फोटो सौजन्य - Instagram)
करीना कपूर ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री पैकी एक आहे. तिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि तिच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. करीना खूप आनंदी देखील आहे आणि ती नेहमीच पॅप्ससोबत हसतमुखाने पोज देताना दिसते. अलीकडेच करीनाने तिची बेस्ट मैत्रिण सोनम कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीला हजेरी लावली. आता सोनमच्या बर्थडे पार्टीतील अभिनेत्रीचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
सोनमच्या बर्थडे पार्टीत करीना कपूर का रडली?
अलीकडेच सोनम कपूरने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अभिनेत्रीने एका भव्य प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये बी टाऊनमधील सर्व सेलिब्रिटी एकमेकांपेक्षा चांगल्या लूकमध्ये पोहोचल्या. करीना कपूर देखील तिची मैत्रीण सोनमच्या वाढदिवसात पिवळ्या ड्रेसमध्ये स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली. परंतु पार्टीमधून बाहेर येतेना अभिनेत्री उदास आणि रडताना दिसली. आता अभिनेत्रीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती होणार कोणाच्या नावावर? बिग बींनी स्वतःच केला खुलासा
आता अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोनमच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतरचा असल्याचे दिसते ज्यामध्ये करीना गाडीत बसताना दिली अभिनेत्री सोबत तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खान देखील दिसत आहे. अभिनेत्री गाडीत खूप भावनिक दिसते. ती तिच्या हाताने तिचे अश्रू पुसताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला रडताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
करीनाच्या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत
करीनाचा रडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, “सैफने तिला फटकारले असेल.” एका चाहत्याने लिहिले, “ती देखील एक माणूस आहे… तिला तिच्या भावना व्यक्त करू द्या,” दुसऱ्याने लिहिले, “ती नेहमीच सुंदर दिसते, पण यावेळी ती भावनिक दिसली आहे.” तसेच आता अभिनेत्री उदास का दिसली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे.
‘Housefull 5’ ने मागील चार भागांचा मोडला रेकॉर्ड, ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा केला पार!
करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मेघना गुलजार यांच्या आगामी ‘दायरा’ या चित्रपटात करीना कपूर खान पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत दिसणार आहे. हा गुन्हेगारी चित्रपट गुन्हा, सूड आणि न्यायाच्या कथेभोवती गुंतलेला आहे. यापूर्वी, करीनाने हंसल मेहतांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडला यामधील अभिनेत्रीची भूमिका जबरदस्त होती.