(फोटो सौजन्य - Instagram)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सोनम बाजवा, जॅकलिन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्यासह २० कलाकारांचा अभिनय असलेला ‘हाऊसफुल ५’ हा कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आपली जादू दाखवत आहे. हा चित्रपट ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि अवघ्या चार दिवसांतच १०० कोटींच्या क्लबमध्ये त्याने चांगली कमाई केली आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे ‘हाऊसफुल ५’ ने सनी देओलचा विक्रम मोडला आहे. यासह, चित्रपटाने स्वतःच्या मागील फ्रँचायझीचा म्हणजेच चारही भागांचा विक्रम मोडला आहे. ‘हाऊसफुल ५’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाकूया.
‘हाऊसफुल ५’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमारचा मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ थिएटरमध्ये जबरदस्त जादू दाखवत आहे. तथापि, चौथ्या दिवशी, इतर तीन दिवसांच्या तुलनेत त्याच्या कमाईत मोठी घट झाली आहे. असे असूनही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘हाऊसफुल ५’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १३.५० कोटी रुपये कमावले आहेत.
शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करचा पहिला व्लॉग समोर, नणंद सबा म्हणाली ‘हा काळ खूप कठीण…’
इतर दिवसांच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, पहिल्या दिवशी चित्रपटाने २४ कोटी रुपये कमावले आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी ३१ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ३२.५ कोटी रुपये कमावले. यासह, ‘हाऊसफुल ५’ची एकूण कमाई १०१ कोटी रुपये झाली आहे.
‘हाऊसफुल ५’ ने त्याच्या मागील चार भागांचा विक्रम मोडला आहे. ‘हाऊसफुल ४’ ने बॉक्स ऑफिसवर ८७.७८ कोटी रुपये कमावले होते. तर ‘हाऊसफुल ३’ ने ६१.५३ कोटी रुपये कमावले होते, तर ‘हाऊसफुल २’ आणि ‘हाऊसफुल’ ने बॉक्स ऑफिसवर ४६.२३ कोटी रुपये आणि ३७ कोटी रुपये कमावले होते. ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या चारही भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामध्ये २० कलाकार असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट चांगलाच उतरला आहे.