
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कृति सेनन बहीण नुपूर सेनन लवकरच गायक स्टेबिन बेनसोबत लग्नबंधणात अडकणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे ८ आणि ९ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचे लग्न उदयपूरमधील प्रसिद्ध फेअरमाँट पॅलेस येथे होणार आहे, जे भारतातील सर्वात सुंदर आणि आलिशान लग्नस्थळांपैकी एक मानले जाते.
मिडीया रिपोर्टनुसार हे लग्न छोटे आणि जवळच्या लोकांमध्ये होणार असले तरी त्यात अनेक नामांकित व्यक्तीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कुटुंबीय, जवळचे मित्र आणि निवडक फिल्म इंडस्ट्रीतील पाहुणे अशी मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
नुपूर किंवा स्टेबिन यांनी अद्याप लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पॅलेसमधील तयारीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. सजावट करणाऱ्या टीम्स आणि हॉटेलचे कर्मचारी तिथेच तयारी करत असल्याची माहिती मिळत असून, त्यामुळे या लग्नाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे
उदयपूरची निवड होणे आश्चर्यकारक नाही. त्याठिकाणची तलावकिनारी राजवाडे, मोठे अंगण आणि राजेशाही वातावरण यामुळे उदयपूर सेलिब्रिटींच्या लग्नासाठी आवडते ठिकाण बनले आहे. विशेषत: फेअरमाँट उदयपूर हे त्याच्या भव्य घुमटांसाठी, मार्बलच्या नक्षीकामासाठी आणि अरवली पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्यांसाठी ओळखले जाते.जर हे लग्न दिलेल्या तारखांना झाले, तर पाहुण्यांना दोन दिवसांचा आलिशान पण खाजगी असा सोहळा अनुभवायला मिळेल, जो राजस्थानच्या श्रीमंतीने भरलेला असेल.
राज निदिमोरुने देखील सामंथाची केली फसवणूक? पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा
नुपूर, जिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे आणि आपल्या मोठ्या अभिनय पदार्पणासाठी तयारी करत आहे, तिने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यनेहमीच शांत आणि लो-प्रोफाइल ठेवले आहे. दुसरीकडे, स्टेबिन बेन हा इंडी-पॉप आणि प्लेबॅक संगीत जगतातला एक प्रसिद्ध नाव आहे. ‘मेरा महबूब’, ‘थोडा थोडा प्यार’ आणि ‘बारिश’ यांसारख्या हिट गाण्यांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.
तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण
सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नाच्या सोहळ्याची सुरुवात ८ जानेवारीला मेहेंदी आणि संगीत कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर ९ जानेवारीला पारंपरिक पद्धतीने मुख्य लग्नसोहळा पार पडेल.कृति सेननचे अनेक फिल्म इंडस्ट्रीतील मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, या लग्नात बॉलिवूडचा रंगतदार माहोल आणि संगीताच्या दमदार परफॉर्मन्सचा सुंदर संगम पाहायला मिळू शकतो. पण आजूनही नुपूर आणि स्टेबिन यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. सेनन आणि बेन कुटुंबांसाठी २०२५ ची सुरुवात खूपच ग्लॅमरस होणार आहे.