मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम नायिका अमृता खानविलकर पुन्हा एकदा एका विशेष बातमीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री तब्बल वीस वर्षानंतर रंगभूमीवर परतणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट गाजवल्यानंतर ही मराठी अभिनेत्री रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे.
“तुम्ही खुप छान….”; राजपाल यादवांच्या ‘त्या’ विधानावर Premanand Maharaj नक्की काय म्हणाले?
अमृता खानविलकर लवकरच रंगभूमीवर ’लग्न पंचमी’ या आगामी नाटकामध्ये तब्बल वीस वर्षानंतर मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहेत. या नाटकाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी यांनी केले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी निपुण धर्माधिकारी यांनी सांभाळले आहे. ’लग्न पंचमी’ या नाटकाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, ‘मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्यासारख्या लोकांसोबत काम करायचे होते. मला वाटते की ते प्रकल्पात एक वेगळी आणि ताजी प्रेरणा आणतात आणि मी त्याचे कौतुक करते. की ही एवढी मोठी संधी मला दिली.’
या आगामी नाटकामध्ये काम करण्यासाठी अमृता देखील खूप उत्साही आहे. तसेच तिला अनेक वर्षापासून रंगभूमीवर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. अमृताची नवी भूमिका काय असेल? आणि नाटकाची कथा काय असेल? हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. अमृताने फक्त सिनेमांमधूनच नाहीतर रिऍलिटी शोमध्ये तिची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि हिंदी चित्रपटांमधूनही प्रसिद्धी मिळवली आहे.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने नटरंग, चंद्रमुखी, 36 डेज, जिवलगा, सत्यमेव जयते, राझी चोरीचा मामला, कट्यार काळजात घुसली, अशा अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका गाजवली आहे. आणि तिने नेहमीच चहा त्यांना तिच्या अभिनयाने आणि नृत्याने मोहित केले आहे. आता अमृताला नव्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा पाहण्यासाठी चाहते खूप आनंदी आहेत.






