(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने नुकतेच १ डिसेंबर २०२५ रोजी दुसरे लग्न करून चाहत्यांना चकीत केले. तसेच अभिनेत्रीने आता स्वतःच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु केला आहे. सामंथाने दिग्दर्शक राज निदिमोरु याच्यासोबत लग्न करून चाहत्यांना खुश केले आहे. सामंथाने प्रमाणेच राज यांचं देखील दुसरं लग्न आहे. राज यांची पहिली पत्नी श्यामली डे हे आहेत. ज्यांच्यासोबत त्यांनी २०२१५ मध्ये लग्न केले.
परंतु, २०२२ मध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे. पण या बातमीनंतर २०२३ मध्ये श्यामलीने व्हेंलेटाईनच्या दिवशी खास पोस्ट शेअर केली, ज्यामुळे व्हायरल होणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आणि त्यांच्यात सगळे ठीक आहे असे चाहत्यांना पटले. पण जेव्हा सामंथा आणि राज यांच्या लग्नाचे फोटो समोर आले, तेव्हा श्यामलीच्या मैत्रिणीने धक्कादायक दावा केला आहे. राज आणि श्यामली यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही… असा खुलासा श्यामलीच्या मैत्रिणीने केला. राज निदिमोरुने दोघींचीही फसवणूक केल्याचे तिने म्हटले आहे.
श्यामलीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
श्यामलीची मैत्रिण भावना तपाडिया हिने श्यामलीने शेअर केलेली एक पोस्ट री-शेअर केली आणि म्हणाली, ‘जी लोकं मला विचारत होते गेल्या वेळी मी जेव्हा चेक केलं, तेव्हा श्यामली आणि राज विवाहित होते… याचा अर्थ असा होतो की, त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही…’ भावना हिच्या अशा वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सामंथाचे चाहते देखील संतापले आहेत.
सामंथाचे चाहते काय म्हणाले?
भावना हिची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामुळे सामंथा हिच्या चाहत्यामध्ये संतापाची लाट दिसून येत आहे… राज याने सामंथाची फसवणूक केली आहे असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तर सामंथाला सर्वकाही माहिती असताना तिने राज याच्यासोबत लग्न का केले? असे अनेक चाहत्यांचे प्रश्न आहे. तर यावर अद्याप सामंथा, राज आणि श्यामली यांनी मौन सोडलेले नाही.
तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण
कोण आहेत भावना आणि श्यामली?
भावना हिने इन्स्टाग्राममध्ये दिलेल्या माहितीनुसार, ती महानायक अमिताभ बच्चन यांच्या KBC मध्ये लेखिका म्हणून काम करते. एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन तिला सोशल मीडियावर फॉलो देखील करतात. तर श्यामली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, श्यामली हिने ‘रंग दे बसंती’ आणि अभिनेता अजय देवगण याच्या ‘ओमकारा’ सिनेमा सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं आहे. त्यानंतर २०२४ मध्ये राज आणि डिके दिग्दर्शत ‘हॅप्पी-एंडिंग’ सिनेमाच क्रिएटिव्ह सुपरवायझर म्हणून देखील काम पाहिले आहे.






