Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prime Video वरील ‘माँ का सम’चा ट्रेलर रिलीज; गणित आणि प्रेमाच्या अनोख्या समीकरणाची रंजक कथा

Prime Video वरील ‘माँ का सम’मध्ये गणित आणि प्रेमाच्या अनोख्या समीकरणाची भावनिक कथा ३ एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये मोना सिंग आणि मिहिर आहुजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 27, 2026 | 02:53 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Prime Video वरील ‘माँ का सम’चा ट्रेलर रिलीज
  • गणित आणि प्रेमाच्या अनोख्या समीकरणाची कथा
  • ‘माँ का सम’ कधी होणार प्रदर्शित?
 

भारतातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Prime Video ने आपल्या आगामी ओरिजिनल मालिके ‘माँ का सम’चा हृदयस्पर्शी आणि मनोरंजक ट्रेलर प्रदर्शित करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. गणित आणि प्रेम यांसारख्या दोन वेगळ्या जगांना एकत्र आणणारी ही अनोखी कथा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देण्यास सज्ज आहे.

दिग्दर्शक निकोलस खार्कोंगोर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि निर्माती बबिता आशिवाल यांच्या निर्मितीत तयार झालेली ही मालिका युनोइया फिल्म्सच्या बॅनरखाली साकारली आहे. लेखक रविंदर रंधावा आणि सुमृत शाही यांनी या कथेला एक वेगळीच उंची दिली आहे. मालिकेत मोना सिंग, मिहिर आहुजा, अंगिरा धर आणि रणवीर ब्रार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

उमेश कामत आणि प्रिया बापटची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस; उलघडणार नात्यांच्या वास्तवाला भिडणारी कथा

‘माँ का सम’ची कथा अगस्त्य या १९ वर्षांच्या गणितातील प्रतिभावान तरुणाभोवती फिरते. गणितातील सूत्रांवर पूर्ण विश्वास ठेवणारा अगस्त्य प्रेमालाही एका समीकरणासारखं समजण्याचा प्रयत्न करतो. “गणित असो किंवा प्रेम… दोन्ही एकच समीकरण आहे,” या विचारातून तो ‘प्रोजेक्ट मॉम’ची सुरुवात करतो—आपल्या एकल आई विनितासाठी (मोना सिंह) योग्य जोडीदार शोधण्याचा हा त्याचा खास प्रयत्न असतो.

कथा पुढे सरकत असताना तर्क आणि भावना यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येतो. रहस्यमय गणित प्राध्यापिका इरा (अंगीरा धर)च्या आगमनामुळे अगस्त्यच्या या मिशनला नवा ट्विस्ट मिळतो. दोघे मिळून परफेक्ट मॅच शोधण्यासाठी गणिती पद्धती तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भावनांचे अनपेक्षित वळण आणि मानवी नात्यांची गुंतागुंत ही कोणत्याही समीकरणात बसत नाही, हे हळूहळू स्पष्ट होत जाते.

या मालिकेची खासियत म्हणजे, ती केवळ प्रेमकथा किंवा कमिंग-ऑफ-एज स्टोरी नाही, तर नात्यांच्या विविध छटा दाखवणारी एक संवेदनशील आणि वास्तववादी कथा आहे. दिग्दर्शक निकोलस खारकोंगोर यांच्या मते, गणिताच्या माध्यमातून भावनांना वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न या मालिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे ही कथा अधिक ताजी आणि वेगळी वाटते.

Ranbir Kapoor च्या ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट, हनुमान जयंतीला दिसणार प्रभू रामाची नवी झलक

विनिताची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंह यांच्यासाठीही हा प्रोजेक्ट खास ठरला आहे. एका एकल आईच्या भूमिकेतून त्या प्रेम, विश्वास आणि नात्यांतील उबदारपणा नव्या पद्धतीने साकारताना दिसणार आहेत. तर अगस्त्यची भूमिका साकारणाऱ्या मिहिर आहूजा याने आईवरील प्रेम आणि तिच्या आनंदासाठी केलेला संघर्ष अतिशय प्रामाणिकपणे मांडला आहे. विनोद, भावना आणि वास्तवाचा सुंदर संगम असलेली ‘माँ का सम’ ही मालिका ३ एप्रिलपासून Prime Video वर हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपशीर्षकांसह ही मालिका भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Maa ka sam trailer prime video mona singh mihir ahuja series release on 3 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Prime Video

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.