फोटो सौजन्य - instagram
टीव्हीवरील आयकॉनिक मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, स्मृती इराणी पुन्हा एकदा तुलसीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे नवे पर्व कालपासून प्रदर्शित झाले, प्रेक्षकांना ही मालिका आवडत आहे. तसेच, पहिला सीझन २००० ते २००८ पर्यंत चालला, ज्यामध्ये अनेक अभिनेत्री दिसल्या. आज या मालिकेमधील एका अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जि या मालिकेपासून नेहमीच चर्चेत राहिली. तसेच ती नव्या पर्वात देखील पुनरागमन करणार असल्याचे समजले आहे.
‘द डार्क नाईट’ फेम अभिनेता Alon Aboutboul यांचे निधन, मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ या नवीन सीझनने येताच टीव्हीवर कब्जा केला आहे. त्याची भावनिक कथा, संस्मरणीय पात्रे आणि प्रतिष्ठित तुलसी विराणीची उपस्थिती त्याला पुन्हा प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडत आहे. या शोबद्दल जुने आणि नवीन प्रेक्षक दोघेही उत्सुक आहेत. दरम्यान, शोच्या सुरुवातीच्या कलाकारांशी संबंधित एक प्रसिद्ध नाव चर्चेचा विषय बनलेली अभिनेत्रीने म्हणजे मंदिर बेदी. मंदिर बेदी ही पुन्हा एकदा या मालिकेत पुनरागमन करणार असल्याचे समजले आहे. ही बातमी ऐकून चाहते ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
सूत्रांनुसार, मंदिरा बेदी जवळजवळ २५ वर्षांनी टेलिव्हिजनवर परतणार आहे आणि तिचे पुनरागमन ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ द्वारे होऊ शकते. मंदिराने शोच्या सुरुवातीला डॉ. मंदिरा कपाडियाची भूमिका साकारली होती, ही भूमिका विराणी कुटुंबाच्या कथेत प्रचंड नाट्य आणि तणाव निर्माण करणारी होती. तिचा अभिनय दमदार आणि संस्मरणीय होता आणि जरी तिची भूमिका जास्त काळ टिकली नाही, तरी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या हृदयावर खोलवर प्रभाव पाडला आहे. आता अभिनेत्रीला पुन्हा एकदा चोथ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘Param Sundari’ चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर, मोशन पोस्टरही केले प्रदर्शित
आता मंदिरा बेदी पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते अशा बातम्या समोर आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्ये हा प्रश्न उपस्थित होत आहे की ती पुन्हा तिची जुनी भूमिका साकारणार की यावेळी आपल्याला पूर्णपणे नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदिराच्या संभाव्य पुनरागमनाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जर ही बातमी खरी ठरली, तर हे नवीन सीझनमधील सर्वात मोठ्या सरप्राईजपैकी एक असू शकते. शोच्या प्रीमियरची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी उत्सुकता आणखी वाढत आहे.