
फोटो सौजन्य - Social Media
२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना
मंगळवारी रात्री मौनी रॉय तिची जवळची मैत्रीण आणि टीव्ही होस्ट अनुषा दांडेकर हिच्यासोबत एका कॅफेमध्ये भेटली होती. भेटीनंतर दोघी कारकडे जात असताना पापाराझींनी सतत तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. साध्या काळ्या मिनी ड्रेसमध्ये आणि नो-मेकअप लूकमध्ये दिसलेल्या मौनीने सुरुवातीला चेहरा हाताने झाकून कॅमेऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वारंवार फोटो काढले जात असल्याने अखेर मौनीचा संयम सुटला. कारमध्ये बसल्यानंतर तिने खिडकीकडे वळून पापाराझींना ठाम शब्दांत “बंद करा!” असे सांगितले. तिच्या शेजारी बसलेल्या अनुषा दांडेकरने तिच्या हातावर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, काही पापाराझींनीही इतरांना “फोटो मत लो, वो मना कर रही हैं” असे सांगत मौनीच्या इच्छेचा आदर करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांनी जानेवारी २०२२ मध्ये विवाह केला होता. चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर १४ मे रोजी दोघांनी संयुक्त निवेदनाद्वारे विभक्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर मौनी सातत्याने चर्चेत असून, आता पापाराझींसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, या घटनेनंतर चाहत्यांकडून सेलिब्रिटींच्या गोपनीयतेचा आदर करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटत आहेत.
शेअर केली पोस्ट!
मौनी रॉयने तिच्या पोस्टमध्ये पापाराझींना स्पष्ट शब्दांत विनंती केली आहे की, “कृपया माझे फोटो काढू नका. मी तुम्हाला कधीही बोलावत नाही आणि यापुढेही बोलावणार नाही. तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम राहील, पण माझ्या मागे येऊन फोटो काढू नका. पुढे जर माझे फोटो कुठे दिसले, तर ते मी पापाराझींना बोलावल्यामुळे नाहीत. कृपया यापुढे कधीही माझे फोटो काढू नका,” असे तिने म्हटले आहे. या पोस्टद्वारे मौनीने तिच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती करत पापाराझींनी तिचा पाठलाग थांबवावा, अशी भावनिक साद घातली आहे.