Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mr. And Mrs. Parashuram : मालिकेचे संपूर्ण शूटिंग मनालीत! अभिनेत्रीने शेअर केला तिचा अनुभव; प्रेक्षक आतुरले

स्टार प्लसवरील मिस्टर अँड मिसेस परशुराम मालिकेतील अभिनेत्री शांभवी सिंहने मनालीतील शूटिंगचा खास अनुभव शेअर केला आहे. बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये शिफॉन साडीत रोमँटिक सीन शूट करणे म्हणजे स्वप्नवत अनुभव असल्याचे तिने सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 03:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • थरारक घटनांबरोबरच काही रोमँटिक प्रसंगांचेदेखील चित्रीकरण करण्यात आले.
  • संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण होते.”
  • मनालीमध्ये पार पडलेल्या शूटिंगचा अनुभव शेअर केला असून तो तिच्यासाठी कायम लक्षात राहणारा ठरला आहे.
“मनालीच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये शिफॉन साडीत रोमँटिक सीन शूट करणे म्हणजे एखाद्या स्वप्नातील क्षण जगल्यासारखे होते,” असे अभिनेत्री शांभवी सिंहने सांगितले आहे. पडद्यावर दिसणारे बर्फाच्छादित निसर्गरम्य दृश्ये प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालतात. मात्र अशा ठिकाणी प्रत्यक्ष चित्रीकरण करणे कलाकारांसाठी अनेकदा आव्हानात्मक ठरते. स्टार प्लसवरील मिस्टर अँड मिसेस परशुराम या मालिकेत शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शांभवी सिंह हिने नुकताच मनालीमध्ये पार पडलेल्या शूटिंगचा अनुभव शेअर केला असून तो तिच्यासाठी कायम लक्षात राहणारा ठरला आहे.

Shilpa Shinde: शिल्पा शिंदेच्या खोट्या लैंगिक छळ प्रकरणावर AICWA निवेदन जारी, थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

मालिकेतील एका महत्त्वाच्या आणि उत्कंठावर्धक ट्रॅकच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम मनाली येथे पोहोचली होती. आगामी भागांमध्ये रोजा या गाजलेल्या चित्रपटापासून प्रेरित कथानक पाहायला मिळणार आहे. या कथानकात परशुरामच्या अपहरणाची घटना दाखवण्यात येणार असून त्यानंतर तो परत कसा येणार आणि त्याच्या मदतीला कोण धावून येणार, याभोवती कथा फिरणार आहे. या थरारक घटनांबरोबरच काही रोमँटिक प्रसंगांचेदेखील चित्रीकरण करण्यात आले.

यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे शांभवी सिंहने मनालीच्या बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये शिफॉन साडी परिधान करून केलेले रोमँटिक दृश्याचे शूटिंग. या अनुभवाबद्दल बोलताना शांभवी म्हणाली, “मनाली शेड्यूलमधील माझा सर्वात आवडता क्षण म्हणजे बर्फाने वेढलेल्या पर्वतरांगांमध्ये शिफॉन साडीत रोमँटिक सीन शूट करणे. त्या वेळी मी जणू एखाद्या जुन्या बॉलिवूड प्रेमकथेचा भाग असल्यासारखे अनुभवत होते. आपण लहानपणापासून पडद्यावर पाहत आलेले असे प्रसंग प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळणे ही खूप खास गोष्ट होती.”

ती पुढे म्हणाली, “पडद्यावर हा सीन खूप सुंदर आणि जादुई वाटेल, पण त्यामागे खूप मेहनत होती. तिथे तापमान अत्यंत कमी होते आणि त्या थंडीत शूटिंग करणे सोपे नव्हते. विशेष म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदाच मला इतक्या जवळून बर्फवृष्टी अनुभवता आली. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी आणखी खास ठरला. आमच्या युनिटमधील अनेक सदस्यांनीदेखील पहिल्यांदाच बर्फ पाहिला होता. त्यामुळे संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण होते.”

Neha Kakkar Birthday: आर्थिक तंगी, 4 वर्ष गात राहिली भजन; शो मधून बाहेर पण झाली त्याच शो ची परीक्षक, नेहा कक्करचा प्रवास

कडाक्याच्या थंडीचा परिणाम तिच्या प्रकृतीवरही झाला. “मुंबईच्या हवामानाची सवय असल्यामुळे सततच्या थंड वातावरणामुळे माझी तब्येत थोडी बिघडली होती. मात्र त्या अप्रतिम लोकेशनवर काम करण्याचा आनंद इतका मोठा होता की सर्व त्रास विसरायला होत होता. अशा सुंदर ठिकाणी शूटिंग करण्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील,” असेही तिने सांगितले. दरम्यान, मिस्टर अँड मिसेस परशुराम या मालिकेतील आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना थरार, भावना आणि रोमँस यांचा संगम पाहायला मिळणार आहे. परशुरामच्या अपहरणानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथानकाला नवे वळण मिळणार असून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता स्टार प्लसवर प्रसारित होते. तसेच जिओहॉटस्टारवरही प्रेक्षकांना ती पाहता येणार आहे.

Web Title: Mr and mrs parashuram serial actress shambhavi singh shared her manali shooting experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Birthday Special: एकता कपूरच्या 10 आयकॉनिक टीव्ही जोड्या; ज्यांनी प्रेमकथांना दिली नवी ओळख
1

Birthday Special: एकता कपूरच्या 10 आयकॉनिक टीव्ही जोड्या; ज्यांनी प्रेमकथांना दिली नवी ओळख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.