
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“नागिन” च्या सातव्या सीझनची घोषणा आधीच करण्यात आली असून, चाहते नागिनची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता, निर्मात्यांनी ही प्रतीक्षा संपवली आहे. निर्मात्यांनी आज मालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर महत्वाची माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये एक खास झलक दाखवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच नागिनची ही झलक पाहून चाहते खुश झाले आहेत. आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
इंद्रायणीला पुढे नवं आव्हान! श्रीकलाची दिग्रस्कर कुटुंबात होणार एन्ट्री? मालिकेला नवे वळण
“नागिन” कधी होणार प्रदर्शित? 
कलर्सच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक मोशन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये नागिनची पहिली झलक उघड झाली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “प्रतीक्षा संपणार आहे, नागिनची पहिली झलक पाहण्यासाठी सज्ज व्हा. बिग बॉस १९ मध्ये २ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजता फक्त कलर्स आणि @JioHotstar वर नागिनची पहिली झलक पहा.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
‘नागिन ७’ चित्रपटाबद्दल 
एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील ‘नागिन’चा प्रत्येक चाहता सातव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहे. यावेळी नागिनला एका नवीन शत्रूचा सामना करावा लागणार आहे. हा नवीन शत्रू म्हणजे अग्निमय ‘ड्रॅगन’. अलीकडेच ‘नागिन ७’ चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, परंतु निर्मात्यांनी नागिनचा चेहरा प्रेक्षकांपासून लपवून ठेवला आहे.
या अभिनेत्री ‘नागिन’च्या भूमिकेत दिसल्या होत्या
एकता कपूरच्या ‘नागिन’ मालिकेत आतापर्यंत सहा सीझन झाले आहेत. यापूर्वी मौनी रॉय, अदा खान, सुरभी ज्योती, निया शर्मा, सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांनी नागिनची भूमिका साकारली आहे. तसेच आता या मालिकेचा नवा भाग पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता या भागात कोणती अभिनेत्री दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.