 
        
        (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक, पुन्हा एकदा घेऊन आले आहे संगीताचा अनोखा उत्सव इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट! या नव्या हंगामात ९०च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. जिथे जुन्या आठवणींना नव्या सुरांचा स्पर्श दिला जात आहे. देशभरातील उत्कृष्ट गायक-गायिकांना मंच देणारा इंडियन आयडॉल यंदा परीक्षकांच्या खास तिकडीसह परतला आहे. श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह. देशभरातून आलेले स्पर्धक आपल्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत, आणि हा हंगाम बनला आहे संगीत, आठवणी आणि भावना यांचा उत्सव.
इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांच्या मनातच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही भावत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांनीही या हंगामाच्या संकल्पनेचं कौतुक केलं असून, त्यांच्या “यादों की प्लेलिस्ट” मधील खास गाणी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहेत.
प्रियांदर्शिनी इंदळकर म्हणाली,“माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये आहे हे गाणं ‘राब्ता’ . हे गाणं एखाद्या व्यक्तीची नाही, पण आयुष्यातील प्रेमाची आठवण नक्की करून देतं.”
तर नम्रता संभेरावेने सांगितले,“माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये एक गाणं आहे जे मी नेहमी माझ्या नवऱ्यासाठी गाते. आणि खरं सांगायचं तर, ते त्याचं आवडतं गाणं आहे. ‘दिल दीवाना बिन सजना के’.”
या दोन्ही प्रसिद्ध मराठी कलाकारांकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे इंडियन आयडॉल चा वारसा किती चिरंतन आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे. यादों की प्लेलिस्ट हा नवा हंगाम प्रेक्षकांच्या तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मनातही स्थान मिळवतो आहे






