
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
खऱ्या कथांना आणि नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या विचारसरणीला पुढे नेत, दीपिकाने आज ‘द ऑनसेट प्रोग्राम’ची घोषणा केली. हा तिच्या ‘क्रिएट विथ मी’ प्लॅटफॉर्मचा पुढचा टप्पा आहे. याचा उद्देश भारतीय फिल्म, टीव्ही आणि जाहिरात क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांना संधी देणे आहे, ज्यामुळे त्यांची कला पाहिली जाणार आहे, ऐकली जाणार आहे आणि योग्य प्रकारे प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करून देणार आहेत.
हा प्रोग्राम केवळ गुणवत्तापूर्ण आणि हुशार लोकांना शिकण्याच्या संधी देणार नाही, तर ज्यांच्याकडे स्वतःचे प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव आणि कौशल्य देखील असणार आहे, त्यांनाही पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, लाईट, एडिटिंग, साउंड, आर्ट, कॉस्च्युम डिझाईन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा क्षेत्रांचा समावेश केला जाणार आहे.
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका म्हणाली, “गेल्या एका वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्तम क्रिएटिव्ह टॅलेंटला ओळख देणे, त्यांना पाहण्यास-ऐकण्यास आणि अनुभव देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याबद्दल मी खूपच प्रामाणिकपणे विचार करत आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढच्या पिढीच्या क्रिएटिव्ह टॅलेंटशी तुम्हा सर्वांना भेट करून देण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.
Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू
भारत आणि परदेशातील क्रिएटिव्ह टॅलेंटला ओळख देण्याच्या आपल्या व्हिजनला पुढे नेत, दीपिका पादुकोणचा ‘द ऑनसेट प्रोग्राम’ आता https://onsetprogram.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, जिथे लोक आपले काम पाठवू शकतात आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्तम व्यक्तीं सोबत काम करण्याची संधी मिळवू शकतात. तिने या संदर्भातील व्हिडिओ आपल्य इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. अभिनेत्रीला या नव्या सुरुवातीला अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.