Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा.. आपला अभिमान..’

बऱ्याच दिवसांपासून रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची चर्चा सुरु होती. आणि आता अशातच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. जो पाहून चाहते त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2026 | 03:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा
  • पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन प्रेक्षकांच्या समोर
  • राजा शिवाजी’ कधी होणार प्रदर्शित?
 

अभिनेता रितेश देशमुखने अखेर त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरु असताना अभिनेत्याने त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरवरील रितेश देशमुख लूक पाहण्यासारखा आहे. अभिनेता या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून, चाहते त्याला या शैलीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत ‘वेड’च्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

या चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी अजय-अतुल या लोकप्रिय जोडीवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या भव्य आणि प्रेरणादायी संगीतामुळे चित्रपटाला अधिक ऐतिहासिक आणि भावनिक उंची मिळण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ मराठी भाषेत मर्यादित न राहता इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतून एक भव्य पॅन इंडिया प्रकल्प साकारत असल्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे.

तसेच, या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त, जिनिलिया देशमुख यांच्यासह इतर मोठे कलाकार झळकणार आहेत. आणि त्यांच्या खास भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भव्य निर्मितीमूल्ये आणि दमदार कलाकारांमुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

रितेश देखमुखने पोस्टर शेअर करताना लिहिले, ‘आज तोच दिवस आहे, जेव्हा अंधाराला पहिल्यांदा प्रकाशाचं स्वप्न पडलं.. जेव्हा इतिहासानं नव्या भविष्याकडे पाउल उचललं… जेव्हा आपल्या मातीला मिळाला नवा स्वाभिमान.. शिवजयंतीच्या पावन निमित्ताने, Jio Studios आणि Mumbai Film Company सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर ! आपला राजा.. आपला अभिमान…’. असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा चित्रपट येत्या १ मे ला संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Riteish deshmukh raja shivaji movie announcement shivjayanti poster release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
4

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.