Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Do Deewane Seher Mein चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; मृणाल ठाकुर आणि सिद्धांतची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी व्हा सज्ज

मृणाल ठाकुर आणि सिद्धांत चतुर्वेदीचा रोमँटिक चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ज्याचे नाव आहे ‘दो दीवाने सहर में'. या चित्रपटाची ॲडव्हान्स सुरु झाली असून, त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2026 | 07:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Do Deewane Seher Mein चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू
  • मृणाल ठाकुर आणि सिद्धांतची रोमँटिक केमिस्ट्री
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स यांच्या आगामी रोमँटिक चित्रपट ‘दो दीवाने सहर में’ने प्रदर्शना आधीच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. भव्यता आणि भावनांची सांगड घालणाऱ्या या बॅनर्सकडून येणारा प्रत्येक चित्रपट वेगळेपण जपतो, आणि यावेळी ते एका ‘इम्परफेक्ट’ पण मनस्वी प्रेमकथेची मांडणी घेऊन आले आहेत.

या चित्रपटात मृणाल ठाकुर आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोघांची नवी जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. त्यांच्या केमिस्ट्रीची झलक ट्रेलरमधूनच पाहायला मिळाली असून, दोघांच्या व्यक्तिरेखांमधील भावनिक गुंतागुंत आणि नजरेतून बोलणारा संवाद प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. ही केवळ प्रेमकथा नाही; तर ती दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या, वेगवेगळ्या जखमा आणि अपेक्षा घेऊन जगणाऱ्या व्यक्तींची भावनिक कथा असणार आहे.

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

शांततेतून उलगडणार प्रेमाच्या भावना

‘दो दीवाने सहर में’ प्रेमाच्या पारंपरिक चौकटी मोडत, संवादांपेक्षा शांततेला अधिक महत्त्व देते. अनेक प्रसंगांमध्ये शब्द नसतात, पण नजर, हावभाव आणि अंतर यांतून नात्यांची गुंतागुंत स्पष्ट होते. आजच्या काळातील नात्यांमध्ये असलेली अनिश्चितता, गैरसमज, स्वाभिमान आणि भावनिक असुरक्षितता यांचा वास्तवदर्शी वेध चित्रपट घेतो. प्रेम नेहमीच परिपूर्ण नसते, कधी ते अपूर्णतेतच पूर्णत्व शोधते. या संकल्पनेवर आधारित कथानक प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्यातील नात्यांची आठवण करून देते. आणि म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटणार आहे.

 

ट्रेलर आणि संगीताची जादू

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भावस्पर्शी पार्श्वसंगीत, सुंदर लोकेशन्स आणि शांत पण प्रभावी संवादांनी कथानकाची झलक अधिक प्रभावी बनवली. गाण्यांमध्येही रूहानी आणि नॉस्टॅल्जिक टोन जाणवतो, जो कथेला अधिक सखोल बनवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केले आहे. भावनिक विषयांची संवेदनशील हाताळणी करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची शैली या चित्रपटात ठळकपणे जाणवते. निर्मितीमध्ये संजय लीला भन्साळी प्रेरणा सिंग, उमेश कुमार बंसल आणि भारत कुमार रंगा यांनी ‘रवि उद्यावर फिल्म्स’च्या सहकार्याने सहभाग घेतला आहे.

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरु

चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक असून अधिकृत ॲडव्हान्स बुकिंग सुरू देखील झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर हा रूहानी रोमँस अनुभवण्यासाठी आपली आसने ॲडव्हान्स बुकिंगमधून राखून ठेवण्याची संधी मिळाली आहे. ‘दो दीवाने सहर में’ हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

Web Title: Do deewane seher mein movie advance booking begin mrunal thakur and siddhant will be seen together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Mrunal Thakur

संबंधित बातम्या

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा
1

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव
2

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
3

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
4

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.