Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दे दो भाईजान!” Dhurandhar 2 च्या यशानंतर पाकिस्तानी चाहत्यांची Aditya Dhar ला 500 कोटींची मागणी

'धुरंधर २' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाबद्दलची चर्चा केवळ भारतातच मर्यादित न राहता पाकिस्तानातही पोहोचली आहे. आता एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 29, 2026 | 12:02 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • धुरंधर २’ ने १० दिवसात केली कोटींची कमाई
  • ‘धुरंधर २’ च्या यशानंतर पाकिस्तानी स्थानिकांची मागणी
  • आदित्य धरकडे मागितले 500 कोटी
 

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून, चित्रपटाने जगभरात १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाची चर्चा पाकिस्तानमध्येही जोरात रंगत असून, तेथील ल्यारी परिसरातील लोकांनीही चित्रपटाच्या यशानंतर आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनी दिग्दर्शकाकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

आदित्य धर यांच्याकडून ५०० कोटींची मागणी

ल्यारीतील लोकांनी आदित्य धर यांच्याकडे ५०० कोटींची मागणी केली आहे. नुकत्याच एका यूट्यूब चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘धुरंधर 2’च्या यशावर स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका व्यक्तीने सांगितले की, “जर चित्रपट १००० कोटी कमावत असेल, तर किमान ५०० कोटी तरी ल्यारीला द्या. अर्धी कमाई जरी दिली, तरी येथे रस्ते बनतील. मुलं या रस्त्यांवर चालताना त्यांच्या पायांना फोड येतात.” असे रहिवास्यांचे म्हणणे स्थानिकांचे म्हणणे आहे.

‘भूत बंगला’ पोस्टपोन होताच Akshay Kumar ने ॲक्शन चित्रपटांवर साधला निशाणा; म्हणाला “सगळं फेक वाटतंय…”

व्हिडिओमध्ये आणखी एका व्यक्तीने म्हटलं, “आम्ही खूप मागणी करत आहोत, पण ल्यारीच्या लोकांना काहीच मिळत नाही… दे दो भाईजान.” असे त्याने म्हटले आहे. जेव्हा यूट्यूबरने दुसऱ्या व्यक्तीला विचारलं की ‘धुरंधर 2’च्या कमाईतून ल्यारीतील लोकांना किती मिळायला हवं, तेव्हा त्याने उत्तर दिलं, “किमान कोट्यवधी तरी मिळायला हवेत. ७०-८० टक्के हिस्सा मिळायला हवा. कमाई कुठून आली आहे? ल्यारीचं नाव आणि इथली परिस्थिती दाखवण्यात आली आहे, तर त्यांना इतकं तरी द्यायला हवं.”

 

“Aditya Dhar ji, attention please…” 🤣🤣 Dhurandhar 2 has earned over ₹1000 crore
so far. Now, people of LYARI are demanding a 50% share for their development. 🤣
Pakistan govt is not developing Lyari despite getting billions in loans from US and IMF. pic.twitter.com/gVaHP3R39W — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) March 27, 2026

भारतीय चाहत्यांनीही केली मजेदार टिप्पणी

या व्हिडिओवर भारतीय चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “आदित्य धर, ल्यारीमध्ये तुमच्या नावाने एक रस्ता असायला हवा.” तर काहींनी याला चुकीचे ठरवत “हे खूप लाजिरवाणं आहे,” असे म्हटले. तर आणखी एका युजरने मजेशीर अंदाजात, “हे तर खूप विनोदी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

500 कोटींच्या ‘सैयारा’नंतर Yash Raj Films चा मोठा धमाका; नव्या रोमँटिक चित्रपटासाठी व्हा सज्ज!

‘धुरंधर 2’ चित्रपटाबद्दल

‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून एकामागोमाग एक विक्रम मोडताना दिसत आहे. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ७७८.७७ कोटी रुपये झाले आहे, तर जागतिक स्तरावर त्याची कमाई ११५१.२२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन प्रमुख भूमिकांमध्ये दिसत आहेत.

 

 

Web Title: Pakistanis demand 500 crore rupees from aditya dhar for lyari after dhurandhar 2 earns thousand crore globally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.