Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यातील सलून आणि स्पाच्या व्यावसायिक वापरावरून वाद निर्माण झाला आहे. सोसायटीच्या तक्रारीनंतर BMCने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात
  • सोसायटीच्या तक्रारीनंतर Bmc ने पाठवली नोटीस
  • देवगण कुटुंबाची काय भूमिका?
Ajay Devgn Juhu Bungalow: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या जुहूतील मालमत्तेमुळे चर्चेत आला आहे. अजय देवगणच्या ‘कपोळ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’मधील बंगल्यात सलून आणि स्पासाठी सुरू असलेल्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. सोसायटीच्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेच्या के-वेस्ट विभागाने संबंधित मालमत्तेला ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेच्या व्यावसायिक वापरासाठी के-वेस्ट विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कागदपत्रे सादर न झाल्याने काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोसायटीने का घेतला आक्षेप?

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अजय देवगणने कपोळ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील आपली एक मालमत्ता भाड्याने दिली होती. या जागेचा वापर सलून आणि स्पासाठी केला जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी आक्षेप घेतला.

सोसायटीने देवगण कुटुंबाला पत्र लिहून संबंधित कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली होती. या जागेचा सलून आणि स्पासाठी कायदेशीररित्या व्यावसायिक वापर करता येतो, हे सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सोसायटीच्या म्हणण्यानुसार, या पत्राला देवगण कुटुंबाकडून प्रतिसाद मिळाला नाही.

BMCने काय म्हटलं?

के-वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित परिसराच्या व्यावसायिक वापरासाठी पालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. सोसायटीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर मालकांकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती. मात्र, ही कागदपत्रे सादर न झाल्याने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली.

देवगण कुटुंबाची काय भूमिका?

दरम्यान, देवगण कुटुंबाकडून या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट करण्यात आली आहे. आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि मंजुरी संबंधित अधिकाऱ्यांकडून रितसर घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अजय देवगणच्या टीममधील चीफ लीगल अँड कम्प्लायन्स ऑफिसर रुचि कनोजिया यांनी सांगितले की, “जागेच्या प्रस्तावित वापराबाबत आवश्यक परवानग्या आणि मंजुरी संबंधित अधिकाऱ्यांकडून रितसर घेण्यात आल्या आहेत.”

उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली

मिळालेल्या माहितीनुसार, देवगण कुटुंबाने या प्रकरणी उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. हे प्रकरण आता को-ऑपरेटिव्ह विभागापर्यंतही पोहोचले असून, तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

नेमका वाद कशावरून?

या संपूर्ण प्रकरणात मालमत्ता भाड्याने देण्याला सोसायटीचा मुख्य आक्षेप नसून, निवासी सोसायटीतील मालमत्तेच्या व्यावसायिक वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ही सोसायटी पूर्णपणे निवासी असल्याचे सांगत, नागरी आणि कायदेशीर परवानग्यांव्यतिरिक्त या बंगल्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करता येतो का, असा सवाल सोसायटीकडून करण्यात आला आहे.

सध्या BMCची नोटीस, सोसायटीची तक्रार आणि देवगण कुटुंबाकडून देण्यात आलेली परवानग्यांची माहिती यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. पुढील प्रक्रियेत संबंधित कागदपत्रे आणि परवानग्यांच्या आधारे या वादावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Web Title: Ajay devgn juhu bungalow bmc stop work notice salon spa marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Ajay Devgn
  • BMC
  • Bollywood

संबंधित बातम्या

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
1

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Drishyam 3: विजय साळगावकरची कथा इथेच संपणार? ‘दृश्यम 4’बाबत दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा
2

Drishyam 3: विजय साळगावकरची कथा इथेच संपणार? ‘दृश्यम 4’बाबत दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.