
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पार्वती थिरुवोथुने “द मेल फेमिनिस्ट” पॉडकास्टमध्ये शेअर केले की तिला बालपणापासूनच कसे छळले गेले, हे तिच्यासोबत अनेक वेळा घडले आहे. एकदा, असे काहीतरी घडले ज्यामुळे ती वेदनेने ओरडू लागली. आणि अभिनेत्री हा प्रसंग शेअर करताना भावुक देखील झालेली दिसली. अभिनेत्री तिच्या बालपणाबद्दल नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात.
पार्वतीने तिच्या बालपणातील अनेक घृणास्पद घटना सांगितल्या. अभिनेत्री पार्वती म्हणाली, “आमचा जन्म होतो आणि नंतर आमचे शोषणही होते. मी एकदा ऑटो रिक्षात बसले असताना मला एका माणसाने चिमटा काढला. तसेच आणखी एक मी माझ्या आईला रेल्वे स्टेशनवर सोडल्यानंतर मी माझ्या वडिलांसोबत परत येत असताना त्या गर्दीत एक माणसाचा हात माझ्या छातीवर लागला आणि तो निघून गेला. तो स्पर्शही नव्हता, तर एक जोरदार केलेला जाणूनबुजून केलेला स्पर्श होता. मी त्यावेळी लहान होते आणि मला आठवते की मला वेदना होत होत्या.”
पार्वतीच्या आईने पुरुषांचे वाईट स्पर्श असे ओळखायचे शिकवले
पार्वतीने नंतर त्या घटनांचा तिच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि तिच्या आईने तिला अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी आणि स्वतःला सांभाळण्यासाठी बाहेरील जगासाठी कसे तयार केले हे सांगितले. पार्वती म्हणाली, “माझ्या आईने मला रस्त्यावरून कसे चालायचे ते शिकवले. विंडो शॉपिंग बंद कर. पुरुषांचे हात ओळख. कल्पना करा की जर एखाद्या आईला तिच्या मुलीला हे सर्व शिकवावे लागले तर काय होईल? आणि हो, अश्लील वर्तन… मी किती वेळा मागे वळून पाहिले आहे आणि एका पुरूषाला त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवताना पाहिले आहे. मला त्यावेळी ते समजले नाही. या अनुभवांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपल्याला खूप नंतर कळते.” असे अभिनेत्री म्हणाली.
पार्वतीची कारकीर्द आणि चित्रपट
व्यावसायिक आघाडीवर, पार्वती हृतिक रोशनच्या एचआरएक्स फिल्म्स बॅनरद्वारे निर्मित “द स्टॉर्म” मध्ये दिसणार आहे. अजितपाल सिंग दिग्दर्शित हा शो मुंबईमध्ये सेट केला आहे आणि त्यात अलाया एफ, सृष्टी श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. पार्वतीने “टेक ऑफ,” “उयिरे,” “करीब करीब सिंगल,” “चार्ली,” “मारियन,” आणि “बेंगळुरू डेज” सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.