(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक अभिनेता विद्युत त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या स्टंट आणि फिटनेससाठी जास्त ओळखला जातो. विद्युत खूप शिस्तबद्ध जीवन जगतो आणि तो इंडस्ट्रीतील सर्वात तंदुरुस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. विद्युतला केरळच्या सर्वात प्राचीन लढाऊ पद्धतींपैकी एक असलेल्या कलारीपयट्टूमध्ये प्रशिक्षण दिले आहे. विद्युत अनेकदा त्याच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतो.
नेमकं कसं आहे Bigg Boss Marathi 6 सीझनचं आलिशान घर? 800 खिडक्या 900 दारं; पाहा Video
अलीकडेच विद्युतने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या प्रशिक्षण सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो झाडावर चढताना दिसत आहे. व्हिडिओबद्दल आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विद्युतने झाडावर चढताना कोणतेही कपडे घातलेले नाही. तो नग्न अवस्थेत दिसत आहे. आता लोक या व्हिडिओवर विविध कमेंट करून अभिनेत्याला ट्रोल करत आहेत.
विद्युत सहजतेने झाडावर चढताना दिसला
व्हिडिओमध्ये विद्युत सहजतेने झाडावर चढताना दिसतो आहे. आणि त्याने संपूर्ण व्हिडिओमध्ये वाईट नजरेचा इमोजी लावलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे नग्न आहे. अभिनेत्याने व्हिडिओसोबत एक कॅप्शन देखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, “कलरीपयट्टू अभ्यासक म्हणून मी वर्षातून एकदा ‘सहज’चा सराव करतो.” सहजचा अर्थ स्पष्ट करताना अभिनेत्याने पुढे लिहिले की, “सहज म्हणजे तुमच्या मूळ स्थितीत परत येणे आणि निसर्गाशी जोडले जाणे आणि एक सखोल संबंध निर्माण करणे.” असे अभिनेत्याने लिहिले आहे.
लोकांनी अभिनेत्याला ट्रोल करण्यास केली सुरुवात
अभिनेत्याने पुढे लिहिले, “वैज्ञानिकदृष्ट्या, सहज तुमच्या शरीरातील अनेक न्यूरोसेप्टर्स, प्रोप्रियोसेप्टर्स आणि सेन्सरी फीडबॅक वाढवण्याचे काम करते. हे मानसिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.” विद्युतचा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याचे समर्थन केले आणि त्याचे कौतुक केले, तर काहींनी त्याला ट्रोल केले, अगदी टार्झन आहेस का? असेही म्हटले आहे.
तसेच अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, विद्युत ‘मद्रासी’, ‘कमांडो’, ‘कमांडो २’, ‘कमांडो ३’, ‘क्रॅक’, ‘अनजान’, ‘जंगली’, ‘सनक’, ‘फोर्स’, ‘बुलेट राजा’, ‘पॉवर’ यांसारख्या चित्रपटामध्ये काम करताना दिसले आहेत. तसेच आता अभिनेता त्याच्या या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलेला दिसत आहे.






