(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा तिच्या स्टाईल, डान्स आणि सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना प्रभावित करते. नुकताच तिने सोशल मीडियावर ‘पॉइजन बेबी’ या गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या गाण्यावर मलायकाने केलेल्या स्टेप्स आणि अदा पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तरुण अभिनेत्री रश्मिका मंदानाही मलायकाच्या या परफॉर्मन्ससमोर कमी पडली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मलायका अरोराचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांनी तिच्या ग्लॅमरस अंदाजावर भरभरून कौतुक केले आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं आहे. या परफॉर्मन्स मधून मलायका सिद्ध करते की वय हा फक्त एक नंबर आहे.
‘राइज अॅन्ड फॉल’मध्ये डबल एलिमिनेशनने धक्का! आदित्य नारायणसह ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बाहेर
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी चित्रपट ‘थामा’ मधील बहुप्रतिक्षित गाणं ‘Poison Baby’ अखेर प्रदर्शित झालं आहे, आणि यामध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस डान्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.गाण्यात मलायका एकदम हॉट आणि यंग दिसत असून, तिच्या दिलखेचक अदा पाहून चाहत्यांना तिच्यावरच प्रेम आलं आहे. इतकंच नाही तर मलायकाच्या अदांपुढे रश्मिका मंदानासुद्धा फिकी वाटू लागली, असं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून दिसतंय.
या गाण्याला जैस्मिन सैंडलस, सचिन-जिगर आणि दिव्या कुमार यांनी आपला आवाज दिला आहे, आणि हे गाणं केवळ व्हिज्युअली नाही तर संगीताच्या बाबतीतही पूर्ण धमाका आहे.हा चित्रपट या महिन्याच्या दिवाळीच्या सुमारास, म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मेडॉक फिल्म्सच्या या नव्या चित्रपटाबाबत आतापासूनच असा अंदाज व्यक्त केला जात आहे की हा चित्रपट या वर्षातील मोठ्या बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांपैकी एक ठरू शकतो.