(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा अॅक्शन हीरो जॉन अब्राहम लवकरच मोठ्या पडद्यावर ‘फोर्स ३’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यामधील सर्वात खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात जॉनच्या अपोझिट साउथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी चौधरी हिची वर्णी लागल्याची जोरदार चर्चा आहे.या अॅक्शन-थ्रिलर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात जॉनसोबत नवी अभिनेत्री झळकणार असून, ती म्हणजे ‘लकी भास्कर’ मधून प्रसिद्धी मिळवणारी साउथची टॅलेंटेड अभिनेत्री मिनाक्षी चौधरी.
‘फोर्स’ आणि ‘फोर्स २’ या दोन्ही अॅक्शनपटांमध्ये जॉनने कमाल अॅक्शन सीन सादर केले होते. आता ‘फोर्स ३’मध्ये तो नव्या अॅक्शन अवतारात दिसणार असून, त्यासोबत मीनाक्षी चौधरीसारखी तगडी अभिनेत्री असणार यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.मिनाक्षी चौधरी ही सौंदर्य स्पर्धा जिंकलेली मॉडेल असून, तिने साउथमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता ती ‘फोर्स ३’मधून बॉलीवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे.
‘मुंज्या’नंतर आता ‘थामा’! मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
मीनाक्षी चौधरी ही साउथ फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सौंदर्य स्पर्धा जिंकलेली असून ‘लकी भास्कर’ या चित्रपटातून तिने सिनेमा जगतात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिने साउथमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आता ती ‘फोर्स ३’ या बॉलीवूड चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव
ही अभिनेत्री ‘फोर्स ३’ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचे वडील दिवंगत बीआर चौधरी भारतीय सेनेतील कर्नल होते. मीनाक्षीने २०१८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत ‘मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल’चा मान मिळविला आणि ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८’ मध्ये फर्स्ट रनरअपही ठरली.चंदीगडच्या सेंट सोल्जर इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलेली मीनाक्षी राज्यस्तरीय स्विमर आणि बॅडमिंटन खेळाडू देखील असून, मॉडेलिंगच्या माध्यमातून सिनेजगतात पदार्पण करणाऱ्या मीनाक्षीने पंजाबमधील नॅशनल डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमधून डेंटल सर्जरीची पदवी प्राप्त केली आहे.