(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता सैफ अली खान आज यशाच्या शिखरावर आहे. त्याचे चित्रपट, त्याची अभिनयशैली आणि त्याचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना भुरळ घालणारे आहे. मात्र, त्याचा अभिनय प्रवास सुरुवातीपासून असा नव्हता. एकीकडे त्याचे वडील मंसूर अली खान पटौदी हे भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू होते, तर आई शर्मिला टागोर या बॉलीवूडमधील अत्यंत यशस्वी अभिनेत्री. तरीही सैफला अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करताना अनेक अडथळे आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावं लागलं.
नुकत्याच ‘एस्क्वायर इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने आपल्या सुरुवातीच्या दिवसांचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितले की, निर्मातीने त्याला एक हजारांच्या बदल्यात किस करण्याची ऑफर दिली होती. जेव्हा मी तुला एक हजार रूपये देईन तेव्हा गालावर १० किस करायचे, अशी अजब मागणी महिला निर्मातीने सैफकडे केली होती, असा धक्कादायक अनुभव अभिनेत्याने शेअर केला आहे.
सैफने पुढे सांगितले की, . “मी सेकंड आणि थर्ड लीड अशा सगळ्या भूमिका केल्या, काही चित्रपट चांगले होते ज्यावर मी टिकून होतो, पण नंतर एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत गेले,”असं सैफने त्याच्या बॉलिवूडमधील स्ट्रगलबाबत बोलताना सांगितले.
सुशांतला आठवत, अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ
सैफ अली खानने १९९३ मध्ये ‘परंपरा’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीस अनेक चढउतार अनुभवलेल्या सैफने नंतर ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘ज्वेल थीफ’ सारख्या सिनेमांमुळे आणि वेब सीरिजमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मोठी लोकप्रियता मिळवली. सैफ आज एक यशस्वी आणि नावाजलेला अभिनेता मानला जातो, ज्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळात तो ‘हैवान’ आणि ‘जिस्म ३’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याला चाहत्यांची मोठी अपेक्षा आहे.
सिद्धांत चतुर्वेदी-त्रिप्ती डिम्रीचा ‘धडक 2’ नेटफ्लिक्सवर; चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलीवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात. त्यांचं नातं जितकं खास आहे, तितकंच त्यांची प्रेमकहाणीही रसिकांच्या मनात घर करून बसलेली आहे. करीना आणि सैफने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी मुंबईमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ‘रॉयल वेडिंग’ असं नाव दिलं गेलं, कारण सैफ हा पटौदी घराण्याचा नवाब आहे आणि करीना कपूर ही कपूर कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील यशस्वी अभिनेत्री.