Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Preity Zinta : प्रीती झिंटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! डिजिटल प्लॅटफॉर्म्सविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या कथित डीपफेक व्हिडिओ, मॉर्फ केलेल्या छायाचित्रे आणि बनावट ऑनलाइन सामग्रीविरोधात न्यायालयीन लढा सुरू केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिला गुगल, मेटा, एक्ससह अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सविरोधात दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 04:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सविरोधात व्यापक दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
  • व्यावसायिक प्रतिष्ठेला आणि ब्रँड मूल्याला धक्का बसत आहे.
  • प्रीती झिंटा तिच्या आगामी ‘बटवारा’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे.
Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री आणि उद्योजिका प्रीती झिंटा हिने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार करण्यात आलेल्या कथित डीपफेक व्हिडिओ, मॉर्फ केलेली छायाचित्रे, बनावट मीम्स आणि खोट्या चॅटबॉट प्रोफाइल्सविरोधात मोठे कायदेशीर पाऊल उचलले आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तिला गुगल एलएलसी, मेटा, एक्स आणि इतर अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सविरोधात व्यापक दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

अॅनिमेशनच्या जगात ‘बाहुबली: द इटरनल वॉर’चा डंका; एनेसी 2026 मध्ये होणार भव्य सादरीकरण

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती झिंटाच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की, तिच्या संमतीशिवाय तिची प्रतिमा, व्यक्तिमत्त्व आणि ओळख वापरून एआयच्या मदतीने विविध प्रकारची डिजिटल सामग्री तयार करण्यात आली. त्यानंतर ही सामग्री इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या कायदेशीर पथकाचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या कृतींमुळे तिच्या सार्वजनिक प्रतिमेला, व्यावसायिक प्रतिष्ठेला आणि ब्रँड मूल्याला धक्का बसत आहे.

सुनावणीदरम्यान वकिलांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की, प्रीती झिंटा भारतीय नागरिक असून तिचे वास्तव्य आणि व्यावसायिक कामकाज प्रामुख्याने मुंबईत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाकडेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित सामग्री देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित होत असल्याने तिच्या प्रतिमेवर सातत्याने परिणाम होत असल्याचा दावाही करण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे आता प्रीती झिंटा अधिकृतपणे संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्म्सविरोधात दिवाणी खटला दाखल करू शकणार आहे. या खटल्यात ती नुकसानभरपाईची मागणी करण्यासोबतच तिच्या परवानगीशिवाय तयार करण्यात आलेली आणि प्रसारित होत असलेली सामग्री हटवण्यासाठी कायमस्वरूपी आदेश देण्याची विनंतीही करणार असल्याचे समोर आले आहे.

TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस

याचिकेत संबंधित प्लॅटफॉर्म्सवर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अनधिकृत वापर झाल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा प्रकारच्या एआय-आधारित सामग्रीमुळे तिच्या नैतिक आणि व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. डिजिटल युगात डीपफेक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे धोके लक्षात घेता हे प्रकरण महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, प्रीती झिंटा तिच्या आगामी ‘बटवारा’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची झलक समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, दीर्घ विश्रांतीनंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Web Title: Preity zinta relief for preity zinta from the bombay high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Bollywood
  • Preity Zinta

संबंधित बातम्या

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
1

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!
2

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.