
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्राइम व्हिडिओने आज आंतरराष्ट्रीय एमी-नामांकित सिरीज फोर मोअर शॉट्स प्लीजच्या शेवटच्या सीझनची घोषणा केली आहे. ही लोकप्रिय सिरीज येत्या १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही मालिका वर्षाच्या अखेरीस धमाकेदारपणे परतत आहे आणि सुट्टीच्या हंगामाच्या अगदी वेळेवर येणारा हा शेवटचा सीझन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. फ्रँचायझीचा हा शेवटचा भाग आहे, ज्यामध्ये विनोद, हृदयस्पर्शी ड्रामा, न थांबणारे शॉट्स आणि जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकलेल्या महिल्यांचा प्रवास यामध्ये दिसणार आहे.
‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये,’ टॅगलाईनसह ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित; रिंकूची लक्षवेधी भूमिका!
यावेळी, सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरू त्यांच्या मुख्य भूमिकेत परतणार आहेत. प्रतीक स्मिता पाटील, मिलिंद सोमण, राजीव सिद्धार्थ, लिसा रे आणि अंकुर राठी हे देखील त्यांच्या भूमिका पुन्हा साकारणार आहेत. या सीझनमध्ये, डिनो मोरिया, अनुसूया सेनगुप्ता आणि कुणाल रॉय कपूर हे देखील नवीन कलाकार म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.
ही मालिका प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सने तयार केली असून, रंगिता प्रीतिश नंदी आणि इशिता प्रीतिश नंदी यांनी निर्मिती केली आहे. तसेच देविका भगत यांनी या मालिका क्रिएट केली आहे. तर, संवाद इशिता मोइत्रा यांनी लिहिले आहेत. फोर मोअर शॉट्स प्लीज! सीझन ४ चे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा आणि नेहा पार्टी मतियानी यांनी केले आहे. ही मालिका १९ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. जी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
शेवटच्या टप्प्यात, फोर मोअर शॉट्स प्लीज! ही मालिका नेहमीच खरी मैत्री, बिनधास्त स्वातंत्र्य आणि महिलांच्या गोड गोंधळावर आधारित आहे. पण यावेळी, या शेवटच्या सीझनमध्ये लोकप्रिय टीम फक्त परत येत नसून, ती एका वचनासह परत येत आहे… एक वचन जे इतर सर्व गोष्टींवर मात करते. आणि अगदी पहिल्या फ्रेमपासूनच, ते सर्व मजा आणि गोंधळाबद्दल गोष्ट उघड करते.