Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हैवन’, ‘हेरा फेरी ३’ आणि ‘या’ चित्रपटांनंतर प्रियदर्शन घेणार रिटायरमेंट, म्हणाले ‘मी थकलोय…’

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रियदर्शन रिटायरमेंट घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी नुकतेच हे उघड केले आहे. काही आगामी चित्रपट पूर्ण केल्यानंतर ते निवृत्त होतील असे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 24, 2025 | 03:27 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रियदर्शन चित्रपटांपासून घेणार रिटायरमेंट
  • ‘हैवन’ चित्रपटाचे चित्रीकरण केले सुरु
  • प्रियदर्शन निवृत्तीबद्दल काय म्हणाले?
दिग्दर्शक प्रियदर्शन हे हिंदी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘हैवान’ आणि ‘हेरा फेरी ३’ चित्रपटांमुळे चर्चेत आहे. प्रियदर्शन आता चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेण्याच्या देखील तयारीत असल्याचे समजले आहे. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतः अशी इच्छा व्यक्त केली की ते आता थकले आहेत. ‘हैवान’ आणि ‘हेरा फेरी ३’ पूर्ण केल्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेण्याचा आपला हेतू उघड केला आहे.

मोठे झुंबर, सोफा आणि बाल्कनी; रणबीर-आलियाचं 2,500,000,000 रुपयांचं पूर्ण झालं घर

‘हैवन’ चित्रपटाचे चित्रीकरण कोचीमध्ये सुरू
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हैवन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. सध्या त्याचे चित्रीकरण कोचीमध्ये सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानसोबत अक्षय कुमार देखील दिसणार आहे. ‘हैवन’ हा चित्रपट प्रियदर्शनच्या २०१६ च्या हिट चित्रपट ‘ओप्पम’ पासून प्रेरित आहे, परंतु त्याच्या संवादांमध्ये आणि पटकथेत बरेच बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, दिग्दर्शकाने त्यांच्या भविष्यातील नियोजनाबद्दल देखील सांगितले आहे.

मोहनलालसोबत १०० वा चित्रपट करणार
‘हैवन’ हा चित्रपट प्रियदर्शनचा ९९ वा चित्रपट आहे. ‘ओप्पम’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा मोहनलाल ‘हैवन’मध्येही छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडेच प्रियदर्शनने ‘ओमनोरमा’शी बोलताना खुलासा केला की त्याची भूमिका प्रेक्षकांसाठी एक आश्चर्यचकित करणारी असेल. तो पुढे म्हणाला की ‘हैवन’ नंतर तो मोहनलालसोबत मुख्य भूमिकेत असलेला त्याचा १०० वा चित्रपट दिग्दर्शित करण्याची योजना आखत आहे. जरी या प्रकल्पाची पटकथा अद्याप अंतिम झालेली नसली तरी, त्याचे चित्रीकरण पुढील वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

अर्जुन बिजलानी घेणार पत्नीपासून घटस्फोट ? ‘बिग बॉस १९’ मध्ये एन्ट्री! या अटकळांवर अभिनेत्याने सोडले मौन

प्रियदर्शन निवृत्तीबद्दल काय म्हणाले?
प्रियदर्शनला अक्षय कुमारसोबत सतत काम करण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “ही सर्व सोयीची बाब आहे’. सिक्वेलबद्दल त्यांनी कबूल केले की, ‘मी सहसा माझ्या मूळ चित्रपटांची सिक्वेलमध्ये कॉपी करत नाही, ही माझी आवडती काम करण्याची शैली नाही’. त्याने पुढे एक धक्कादायक टिप्पणी केली की, “हे चित्रपट पूर्ण केल्यानंतर, मी निवृत्त होण्याची आशा करतो. मी थकलो आहे.” असे म्हणून दिग्दर्शकाने निवृत्ती घेण्याबद्दल आपले मत मांडले.

Web Title: Priyadarshan planning to retire after finishing upcoming films haiwaan hera pheri 3 and his 100th movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

‘साई बाबा’ फेम सुधीर दळवी यांची मृत्यूशी झुंज, शिर्डी ट्रस्ट करणार मदत; उच्च न्यायालयाने दिली मान्यता
1

‘साई बाबा’ फेम सुधीर दळवी यांची मृत्यूशी झुंज, शिर्डी ट्रस्ट करणार मदत; उच्च न्यायालयाने दिली मान्यता

मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!
2

मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!

‘रातो की नींद हराम…’, राज निदिमोरू आणि समांथाच्या लग्नावर Ex पत्नी श्यामलीने आता सोडले मौन!
3

‘रातो की नींद हराम…’, राज निदिमोरू आणि समांथाच्या लग्नावर Ex पत्नी श्यामलीने आता सोडले मौन!

तर… ‘या’ दिवशी होणार नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या “संभवामी युगे युगे” चा पहिला शो!
4

तर… ‘या’ दिवशी होणार नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या “संभवामी युगे युगे” चा पहिला शो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.