फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ : टेलिव्हिजनवर सुरू असलेला वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस 18 सध्या चर्चेचा विषय आहे. होस्ट सलमान खान कालच्या भागांमध्ये विकेंडचा वार आणि दिवाळी सेलिब्रेशनसाठी बिग बॉसमध्ये पाहायला मिळाला. कालच्या भागांमध्ये अनेक स्पर्धकांना सलमानने फटकारले त्याचबरोबर अनेक मोठे खुलासे देखील केले आहेत. यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे खरे चेहरे समोर घेताना दिसले. यामध्ये सलमान खानने घरातील सदस्यांना समजावले तर काही बाहेरील प्रेक्षकांच्या आणि नात्यांच्या प्रतिक्रिया देखील सांगितल्या. कालच्या भागानंतर आता सोशल मीडियावर एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रविवारच्या भागामध्ये रवी किशन बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आता बिगच्या घरातला स्पर्धक रजत दलालने बिग बॉसचा लाडला व्हिव्हियन डीसेनाला त्याने खुले आम धमकी देताना दिसला आहे.
आजच्या म्हणजेच रविवारच्या भागामध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धक रवी किशन आता लवकरच घरामध्ये दिसणार आहेत. विकेंडचा वार हा शुक्रवार आणि शनिवारी होत असल्यामुळे आता रविवारी रवी किशनचा नवा सेगमेंट बिग बॉसच्या घरामध्ये दाखवला जाणार आहे. यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. कालच्या भाग झाल्यानंतर रवी किशन पोलीस ऑफिसरच्या अंदाजात धमाकेदार एन्ट्री करताना दिसणार आहे. यावेळी रवी किशन येतात आणि रजत दलालवर निशाणा साधतात यावेळी ते म्हणतात की “अशा छोट्या छोट्या धमक्या कशाला देत आहात. यावर व्हिव्हीयन डीसेना त्यांना उत्तर देतो “जो खरा मर्द असतो तो अशा पोकळ धमक्या देत नाही तो करून दाखवतो. पुढे तो म्हणतो की, याच वय कमी आहे त्याने अजून आयुष्यामध्ये पहिलेच तरी काय आहे. यावर रजत दलाल संतप्त होतो आणि म्हणतो की, मी व्हीव्हियन भावासारखे हात जोडताना पाहिले आहेत आणि कान पकडताना पाहिले आहेत. कोंबडा बनवताना त्यांना चालवलं देखील आहे एवढी त्याची औकात नाही आहे.
यावर रवी किशन पुढे म्हणतात की, जर तुला व्हिव्हियन एवढाच खोटा वाटतो तर मग त्याला इथे करून दाखव. यावर रजत दलाल रवी किशनला म्हणतो की, एकदा माझा कॉन्ट्रॅक्ट काढून टाका मग मी त्याच्या जिभेने बघा काय काय साफ करून दाखवतो. रवी किशन यावर म्हणतात की जीवनामध्ये न हात उचलता खेळणे हाच तर खेळ आहे. रजत म्हणतो, जीवनात पहिल्यांदाच मी बिग बॉसच्या घरात आलो आहे. रवी म्हणतात, सगळेच पहिल्यांदाच येतात मी सुद्धा पहिल्यांदाच आलो होतो. १० वेळा कोण येत बिग बॉसच्या घरात. आता याचा वाद कोणत वळल घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मागील आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये शेहजादा धामीला घराबाहेरच रस्ता दाखवण्यात आला आहे. मागील चार आठवड्यापासून बिग बॉसचे सदस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत.