
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांना २०२५ मध्ये त्यांच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवशीच त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या मुलीचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. आणि आज सोशल मीडियावर त्यांनी गोड मुलीची पहिली झलक शेअर केली आणि तिचे नावही जाहीर केले आहे.
देवी पार्वतीच्या नावावरून नामकरण
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक संयुक्त पोस्ट शेअर केली आहे. एका फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे की, “हात जोडून आणि संपूर्ण हृदयाने, आम्ही तुम्हाला आमच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची ओळख करून देत आहोत.” त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव “पार्वती पॉल राव” असे ठेवले आहे. या सोबतच त्यांनी तिघांच्या हाताचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बाळाचा गोंडस छोटा हात आई-बाबांच्या मध्ये आहे.
सोनाक्षी सिन्हापासून ते भूमीपर्यंत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी अलिकडेच एका पोस्टमध्ये त्यांच्या मुलीची पहिली झलक शेअर केली. परंतु, या जोडप्याने तिचा चेहरा उघड केलेला नाही. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये पत्रलेखा आणि राजकुमार राव त्यांच्या लहान मुलीचा हात धरून आहेत. सोनाक्षी सिन्हापासून ते भूमी पेडणेकरपर्यंत, असंख्य सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच चाहते देखील खुश झाले आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी त्याच्या गोड मुलीचे स्वागत केले, आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.