
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या सध्या त्या त्यांच्या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये तिने जोरदार किसिंग आणि बोल्ड सीन दिले आहेत. आता राखी सावंत बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या चर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’च्या स्टेजवर पाहायला मिळणार. एका मुलाखतीत तिने सांगितले की,सलमान खान तिच्या या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया देईल.
राखी सावंतने सलमान खानसोबतच्या आपल्या बॉंडिंगबद्दल खुलासा केला. राखीने म्हटले की, “देवांनंतर माझ्यासाठी सलमान भाई आहेत.”
सलमान खानला किसिंग सीन आवडत नाहीत, असा प्रश्न विचारला असता राखी सावंत म्हणाली, “तो मला नक्की ओरडेल, सलमान भाई ने हा म्युझिक व्हिडिओ चुकून पाहिला तर ते चप्पल फेकून मारतील. मला तर खूप भीती वाटत आहे.”
तसेच राखीने सांगितले, “मी डायरेक्टरला म्हटलं की बिग बॉस 19 मध्ये गाण्यासाठी जाऊ, पण जे गाणं दाखवायचं आहे त्यातून किसिंग सीन काढून टाका. सलमान भाईला हे सगळं आवडत नाही, त्यांना किसिंग सीन आवडत नाहीत.”
यावेळी राखीनं सांगितलं की,ती’बिग बॉस 19′ मध्ये 200 कोटी रुपये किमतीची साडी नेसून स्टेजवर जाणार आहे. तिच्या साडीवर खऱ्या सोन्याच्या तारा आहेत आणि ही साडी त्यांनी खास बनवून घेतली आहे.
लेस्बियन टॅग आणि सिगारेट वादामुळे एका रात्रीत चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
काही दिवसांपूर्वी राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात ती मीका सिंगसोबत दिसत होती. आता पुन्हा राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती मीका सिंगवर अनेक आरोप करत आहे आणि म्हणत आहेत की ‘त्यांच्या मुळे मी मुंबई सोडून चाली आहे.”