(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
साई पल्लवी सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. साई रामायणात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या चित्रपटापूर्वी सई ‘एक दिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याची रिलीज डेट देखील जाहीर झाली आहे. तसेच अभिनेत्रीच्या सहकलाकारचे नाव देखील समोर आले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार खानच्या लेकासाोबत अभिनेत्रीची जोडी जुळणार आहे.
जुनैद आणि साई पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत
१२३ तेलुगु.कॉमवरील बातमीनुसार, साई पल्लवी तिच्या पहिल्या बॉलीवूड रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘एक दिन’ द्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान तिच्यासोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे करणार आहेत. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत तयार केला जात आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते मन्सूर खान असणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘Krrish 4’ चित्रपटाबाबत समोर आले खास अपडेट, प्रियांकानंतर आणखी दोन नवे कलाकार सामील!
‘एक दिन’ कधी प्रदर्शित होणार?
अखेर, साई पल्लवी आणि जुनैद खान यांचा ‘एक दिन’ हा पहिला एकत्र चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख निश्चित झाली आहे. हा रोमँटिक ड्रामा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जुनैदचा साई पल्लवीसोबतचा हा पहिला चित्रपट आहे. तसेच साईचे बॉलीवूडमधील काम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील मोठा असल्यामुळे या चित्रपटाला काय प्रतिसाद मिळतो हे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
साईचे आगामी चित्रपट
‘एक दिन’ व्यतिरिक्त, साई पल्लवी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, यश आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रामायणाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यश-रावण, सनी देओल-हनुमान, रवी दुबे-लक्ष्मण, साई पल्लवी-माता सीता आणि रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक शेअर करण्यात आला, जो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.