Casting Arun Govil as Dashrath in ramayan movie Feels Strange Dipika Chikhlia Reacts ramayan serial
नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला. तेव्हापासून प्रेक्षक चित्रपटाबद्दल कमालीचे उत्सुक आहेत. शिवाय, चित्रपटाची स्टारकास्ट देखील चाहत्यांच्या समोर आली होती. अनेकदा चित्रपटाचे कौतुक होत असताना, चित्रपटावर टीका देखील करण्यात आली आहे. १९८७ साली दुरदर्शनवर टेलिकास्ट झालेली, ‘रामायण’ मालिकेतल्या सीतेने ‘रामायण’ चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त करत काही खुलासे केले आहेत.
२४ ऑगस्टपासून सुरु होणार प्रसिद्ध रिॲलिटी शो, सलमान खानकडे नसेल ‘ही’ संपूर्ण जबाबदारी ?
‘रामायण’ मालिकेमध्ये अभिनेता अरूण गोविल यांनी प्रभू श्री रामाची भूमिका साकारली आहे. प्रभू श्री रामाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याला चित्रपटामध्ये दशरथच्या भूमिकेत पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप विचित्र वाटेल, असं मत अभिनेत्री दीपिका चिखलीयाचं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “मला ‘रामायण’ चित्रपटांच्या मेकर्सने एकही रोल ऑफर केला नाही. मेकर्सने जरीही मला कोणत्या भूमिकेसाठी विचारलं असतं, तरीही मी त्यांना नकारच दिला असता. मी पूर्वीच दुरदर्शनवर टेलिकास्ट झालेल्या ‘रामायण’ सीरियलमध्येसीतेची भूमिका साकारली आहे. आता माझ्याकडे ‘रामायण’मध्ये काम करण्यासाठी कुठलेही पात्र शिल्लक राहिलेले नाही.”
भारताला ऑस्कर जिंकून देणाऱ्या MM Keeravani यांच्या वडिलांचे निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
राजा दशरथच्या भूमिकेसाठी अभिनेता अरुण गोविलला कास्टिंग करण्याबद्दल अभिनेत्री दीपिका म्हणाली, “मी अरुण गोविल यांना कायमच प्रभू श्री राम म्हणूनच पाहिलं आहे. त्यांना दशरथाच्या भूमिकेत पाहणं खूप विचित्र वाटतंय. ते माझ्यासाठी कायम प्रभू रामच राहतील. अरुण गोविल यांचं व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरचं तेज हे प्रभू रामासारखंच वाटतं. त्यामुळे त्यांना रामाच्या वडिलांच्या रूपात पाहणं मनाला पटत नाही. माझ्या अंदाजे कोणत्या भूमिकेत काम करावे आणि कोणत्या भूमिकेत काम करू नये, हा निर्णय स्वत: अरूण गोविल यांचा आहे. चाहते त्यांना राजा दशरथच्या भूमिकेत पाहून कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.”
‘रामायण’ चित्रपटात दीपिका यांना डावललं? या प्रश्नावर दीपिका यांनी उत्तर दिलं की, “नव्या ‘रामायण’ चित्रपटासाठी मला केव्हाही विचारण्यात आलं नाही. माझ्याशी कोणताही संवाद करण्यात आला नाही. एकदा मी सीता साकारली आहे, त्यामुळे पुन्हा ‘रामायण’ चित्रपटात मी दुसरी भूमिका साकारणं माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. जेव्हा एखादी पवित्र कथा पुन्हा सांगायची असते, तेव्हा मूळ कलाकारांविषयी आदर ठेवणं आवश्यक असतं. ‘रामायण’ ही भावनिक गोष्ट आहे. प्रेक्षक अजूनही आम्हाला त्या भूमिकांमधूनच ओळखतात.” असं अभिनेत्री मुलाखती दरम्यान सांगितलं. ‘रामायण’ चित्रपटाविषयी बोलायचं तर, रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार असून, हा भव्य चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर, साई पल्लवीसोबत चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, रावणाच्या भूमिकेत यश तर भरताच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे झळकणार आहे. सध्या चाहत्यांना ‘रामायण’ चित्रपटाची उत्सुकता आहे.