Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामायण सिनेमाच्या टीमने चाहत्यांना वाटले सोन्याचे शंख? व्हायरल व्हिडिओने वेधलं लक्ष; सिनेमाची होतेय जोरदार चर्चा

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' चित्रपटाची SDCC 2026 मध्ये विशेष झलक सादर करण्यात आली असून, त्यानंतर सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेला 'रामायण' थीम असलेला गिफ्ट बॉक्स उघडताना दिसत असून, त्यात सोन्याच्या रंगाचा नक्षीदार शंख असल्याचे पाहायला मिळते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 26, 2026 | 07:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • खास प्रेझेंटेशनने उपस्थित प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.
  • सोशल मीडियावरील या दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.
  • दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नसला, तरी सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) 2026 मध्ये दाखवण्यात आलेल्या खास प्रेझेंटेशनने उपस्थित प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.

Anandi Ajay Breaks Down: विजय थलपतीच्या जन नायगन’ सिनेमातील ‘तो’ सीन कापला, अभिनेत्रीला अश्रू अनावर, व्हिडिओ चर्चेत

याच कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका महिलेला आकर्षक गिफ्ट बॉक्स उघडताना पाहायला मिळते. कमळाच्या चिन्हाने सजवलेल्या या बॉक्समध्ये ‘रामायण’ टीमचा संदेश आणि सोन्याच्या रंगाचा नक्षीदार शंख असल्याचे दिसते. त्यामुळे हा गिफ्ट चित्रपटाच्या टीमकडूनच देण्यात आला होता का, याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

तथापि, हा शंख अधिकृतपणे निर्मात्यांकडून भेट म्हणून देण्यात आला होता, याची अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. तसेच या व्हायरल व्हिडिओबाबत चित्रपटाच्या टीमनेही कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील या दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.

‘तारिणी’ मालिकेच्या टीमचे स्वादिष्ट स्वागत! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या रेस्टोरंटमध्ये घेतला नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद

The attention to detail is simply exquisite.#Ramayana pic.twitter.com/cQz15BugqN — Walter Black (@BryanBergX) July 24, 2026

दरम्यान, SDCC कार्यक्रमात निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही उत्तर दिले. ‘रामायण : पार्ट 1’ हा चित्रपट नियोजित वेळेनुसार दिवाळी 2026 मध्येच प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे चित्रपट लवकर प्रदर्शित होणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, यश रावण आणि साई पल्लवी माता सीता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल, रवि दुबे, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, अरुण गोविल, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, शीबा चड्ढा आणि इंदिरा कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ramayana distributed golden conch shells to the fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Ramayana
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?
1

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.