Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खऱ्या इतिहासावर आधारित ‘रणबली; विजय आणि रश्मिकासाठी चाहते उत्सुक, भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा

‘रणबली’ हा आगामी भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच आता चित्रपटाची सर्वत्र जोरदार सुरु असताना, तो कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 01:01 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • खऱ्या इतिहासावर आधारित ‘रणबली
  • विजय आणि रश्मिकासाठी चाहते उत्सुक
  • भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा
 

‘रणबली’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला आणि राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित हा चित्रपट एक भव्य ऐतिहासिक नाट्यपट म्हणून साकारला जात आहे.

‘रणबली’ची कथा १९ व्या शतकातील दक्षिण भारतातील रायलसीमा प्रदेशातील खऱ्या घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा उद्देश इतिहासातील जास्त न समजलेल्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या कथांना मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे सादर करण्याचा आहे. दिग्दर्शक राहुल संकृत्यायन यांनी या चित्रपटासाठी सखोल संशोधन केले असून, त्यांनी इतिहासकार, कवी आणि स्थानिक कथांमधून माहिती गोळा केली आहे. त्यांच्या मते, इतिहास केवळ पुस्तकांमध्ये नसतो, तर तो लोकांच्या परंपरांमध्ये, कथा-कहाण्यांमध्ये आणि संस्कृतीत जिवंत असतो. असे त्यांचे म्हणणे आहे.

‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट

चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलताना राहुल संकृत्यायन यांनी सांगितले की, ‘रणबली’मधील अनेक प्रभावी प्रसंग हे विस्मृतीत गेलेल्या गावांमधील अनुभव आणि जुन्या दस्तऐवजांमधून प्रेरित आहेत. त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या गावाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी पाहिलेल्या एका जुन्या प्रथेने चित्रपटाच्या क्लायमॅक्सला आकार दिला, ही बाब या कथेला अधिकच वास्तववादी बनवते.

या चित्रपटात विजय देवरकोंडा एका निर्भय आणि बंडखोर व्यक्तीची भूमिका साकारत आहे. हा पात्र एक राजघराण्यातील प्रभावशाली सरदार असून, त्याच्या व्यक्तिमत्त्वात अधिकार, आक्रमकता आणि अंतर्गत संघर्ष यांचा मिलाफ आहे. या भूमिकेसाठी विजयने विशेष तयारी केली असून, त्याने जुन्या रायलसीमा बोलीचा अभ्यास केला तसेच घोडेस्वारीचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. चित्रपटातील घोडे हे केवळ प्रॉप नसून कथानकाचा महत्त्वाचा भाग असल्याचे दिग्दर्शकांनी स्पष्ट केले आहे.

चित्रपटात रश्मिका मंदाना देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तिच्या पात्रात त्या काळातील स्त्रीची ताकद आणि संवेदनशीलता दोन्हीही दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय हॉलीवूड अभिनेता आर्नोल्ड वोस्लू ‘सर थिओडोर हेक्टर’ या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यांनी विशेष भाषिक प्रशिक्षण घेतले असून, त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाच्या वसाहतवादी पार्श्वभूमीला अधिक खोली मिळाली आहे.

साई पल्लवी-जुनैद खानच्या ‘एक दिन’ची खास गोष्ट; निर्माता म्हणून मन्सूर खानने साकारली अनोखी भूमिका

राहुल संकृत्यायन यांच्या मते, आजचा प्रेक्षक इतिहास आणि पौराणिक कथांवर आधारित भव्य चित्रपटांकडे अधिक आकर्षित होत आहे. पारंपरिक प्रेमकथा आणि कौटुंबिक नाटकांपलीकडे जाऊन प्रेक्षक आता वेगळ्या, वास्तववादी आणि मोठ्या कॅनव्हासवरील कथा अनुभवण्यास उत्सुक आहेत. ‘रणबली’ हा त्याच बदलत्या आवडीचा परिणाम आहे.

एकूणच, सशक्त कथानक, सखोल संशोधन, भव्य मांडणी आणि दमदार कलाकार यांच्या जोरावर ‘रणबली’ हा चित्रपट एक वेगळा आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. इतिहास, भावना आणि ॲक्शन यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार असून, त्यांना एका विस्मृतीत गेलेल्या काळाशी नव्याने जोडणार आहे.

Web Title: Ranbali movie vijay deverakonda rashmika mandanna historical flim 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Bollywood
  • rashmika mandanna
  • vijay devarkonda

संबंधित बातम्या

Vipul Amrutlal Shah: ‘द केरळा स्टोरी २’ आणि ‘गव्हर्नर’च्या यशानंतर विपुल शाह भावुक; नव्या टॅलेंटसाठी केली मोठी घोषणा
1

Vipul Amrutlal Shah: ‘द केरळा स्टोरी २’ आणि ‘गव्हर्नर’च्या यशानंतर विपुल शाह भावुक; नव्या टॅलेंटसाठी केली मोठी घोषणा

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण
2

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत
3

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!
4

‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.