
फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूड अभिनेत्री Rhea Chakraborty हिने काही काळ सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी तिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपण स्वतःपासून हरवल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. एकंदरीत, तिच्याकडून पाहून वाटत आहे की ती सध्या मानसिक त्रासही झुंज देत आहे. मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि आयुष्यातील खरे क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी हा ब्रेक घेत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
रिया हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सोशल मीडियावरील सततचा गोंधळ, अखंड स्क्रोलिंग आणि प्रत्येक गोष्टीशी अपडेट राहण्याचा ताण आता तिच्यावर परिणाम करू लागला आहे. या धावपळीत शांतता, साधेपणा आणि कोणताही क्षण कॅमेऱ्यात कैद न करता जगण्याचा आनंद हरवल्यासारखा वाटत असल्याचेही तिने नमूद केले. त्यामुळे काही काळ सोशल मीडियापासून दूर राहून स्वतःला वेळ देण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.
तिने पुढे लिहिले की, आता तिला आयुष्य थोडं निवांतपणे जगायचं आहे, मोकळेपणाने श्वास घ्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींशी पुन्हा नातं जोडायचं आहे. “सध्या पोस्ट करण्यापेक्षा आयुष्याचे क्षण मनापासून जगणं अधिक महत्त्वाचं वाटत आहे,” असेही तिने पोस्टमध्ये म्हटले. तसेच, लवकरच पुन्हा भेटू, असा संदेशही तिने चाहत्यांना दिला. रिया हिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्याविषयी काळजी आणि पाठिंबा व्यक्त केला. अनेकांनी तिच्या निर्णयाचे समर्थन करत मानसिक आरोग्यासाठी असा ब्रेक गरजेचा असल्याचे म्हटले, तर काहींनी तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, जून २०२० मध्ये अभिनेता Sushant Singh Rajput यांच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती मोठ्या चर्चेत आली होती. त्यावेळी दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर ड्रग्स प्रकरणात Narcotics Control Bureau कडून तिची चौकशी करण्यात आली होती आणि सप्टेंबर २०२० मध्ये तिला अटकही झाली होती. नंतर तिला जामीन मिळाला असला तरी त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये मोठे बदल झाले.