फोटो सौजन्य - इन्टाग्राम
२०२२ मध्ये, ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. एका लोककथेवर आधारित, ग्रामीण वातावरणाच्या या कथेने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने केले असून, अभिनेत्याने या चित्रपटात मुख्य भूमिका देखील साकारली होती. आज या उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेत्याचा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या ऋषभ शेट्टीच्या कारकिर्दीतील काही खास गोष्टी.
पाणी विकण्यापासून ते रिअल इस्टेटमध्ये केले काम
मंगळुरू शहरात जन्मलेल्या ऋषभ शेट्टीने बेंगळुरू येथून बी.कॉम.चे शिक्षण घेतले, याच काळात त्याने नाट्यसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. ऋषभच्या नाट्यक्षेत्रातील कामाचे कौतुक झाले. यामुळे त्याला अभिनयात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. पण हा मार्ग सोपा नव्हता, तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता. ऋषभला कुटुंबावर ओझे व्हायचे नव्हते, म्हणून त्याने आपला खर्च भागवण्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकल्या. रिअल इस्टेट आणि हॉटेलमध्ये काम केले. या नोकऱ्यांसोबतच त्याने चित्रपट दिग्दर्शनात डिप्लोमाही केला.
ऋषभ शेट्टीने स्वतःच्या वाढदिवशी दाखवली Kantara: Chapter 1 ची पहिली झलक, कधी होणार चित्रपट रिलीज?
चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केला प्रवेश
डिप्लोमा केल्यानंतर ऋषभने चित्रपट क्षेत्रात येण्याचे पूर्णपणे मनाशी ठरवले. दक्षिण चित्रपटसृष्टीत क्लॅप बॉय, स्पॉट बॉय आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या काळात ऋषभ शेट्टीची रक्षित शेट्टीशी भेट झाली. दोघेही चांगले मित्र बनले. रक्षितने नंतर ऋषभला त्याच्या चित्रपटात अभिनय करण्याची संधी दिली.
अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली
ऋषभ शेट्टी नेहमीच अभिनय करू इच्छित होता. अशा परिस्थितीत, जेव्हा तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता, तेव्हा त्याला ‘तुघलक (२०१२)’ चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर रक्षित शेट्टीने त्याच्या दिग्दर्शित चित्रपटात ऋषभला महत्त्वाची भूमिका दिली. हळूहळू ऋषभने अभिनयात स्वतःचे नाव कमावले. त्यानंतर त्याला ‘बेल बॉटम (२०१९)’ हा चित्रपट मिळाला, या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला. त्यानंतर तो ‘गरूड गमन वृषभ वाहना’ (२०२१) या चित्रपटातही दिसला. या चित्रपटातही त्याला खूप पसंती मिळाली. यानंतरही ऋषभ अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसला.
५० रुपये वाचविण्यासाठी उपाशी राहायचा गायक, आज आहे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव
दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय चित्रपट केले
ऋषभ शेट्टीला अभिनेता म्हणून ओळख मिळाली तेव्हा त्याने दिग्दर्शनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार केला. ऋषभचा पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘रिकी’ होता, त्यानंतर त्याने ‘किर्की पार्टी’ हा चित्रपट बनवला. त्यानंतर त्याने ‘कासरगोडू कोडुगे: रमन्ना राय’ सारखा उत्तम चित्रपट बनवला. हे सगळे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.
२०२२ मध्ये ‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करून ऋषभ देशभर प्रसिद्ध झाला
‘कांतारा’ चित्रपटात त्याने मुख्य भूमिकाही साकारली होती. हा चित्रपट फक्त १६ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याने ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘कांतारा’ चित्रपटात तुळु राज्यातील लोक देवतांची कथा एका खास संदेशासह दाखवण्यात आली होती. चित्रपटात त्या विशिष्ट राज्यातील संस्कृती, लोककथा आणि श्रद्धा ज्या पद्धतीने दाखवण्यात आल्या, तो अनुभव प्रेक्षकांसाठी नवीन आणि अविस्मरणीय होता. ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कांतारा’ ला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला. आता ऋषभ ‘कांतारा’ चित्रपटाचा दुसरा भाग बनवत आहे. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.