
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” चा ग्रँड फिनाले काल ७ रोजी पार पडला आहे. यावेळी गौरव खन्ना या शोचा विजेता ठरला आहे. ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने ‘किक २’ या आगामी चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. अभिनेत्याने असेही म्हटले की तो चित्रपटासाठी प्रणित मोरेची शिफारस करेल. आता प्रणितच्या हाती हा मोठा प्रोजेक्ट लागला आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसेच सांगायचे झालं तर प्रणित हा ‘बिग बॉस’ १९ चा टॉप ३ स्पर्धक बनला आहे.
‘किक २’ सलमान खानने केली घोषणा
प्रणित मोरे शोमधून बाहेर पडण्यापूर्वी त्याला एक टास्क देण्यात आता की तुमच्या कोणत्या सवयी तुम्ही ‘बिग बॉस’ च्या घरात सोडून जाल. यावर प्रणित म्हणाला, “माझ्याकडे एक सामान होते जिथे मी अनेक बॉलीवूड कलाकारांवर विनोद करायचो. म्हणून मी ते सामान इथेच सोडून पुढे जात आहे.” मग सलमान खान म्हणाला, “थांबा, आम्ही ते सामान साफ करू. आम्ही करू. ती तुमची जबाबदारी नाही. ती आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, भाऊ. आता मी किक २ करत आहे. म्हणून मी १०० टक्के तुमचे नाव शिफारस करत आहे.” असे सलमान बोलताना दिसला आहे.
BIG BREAKING 🚨 SALMAN KHAN ANNOUNCED KICK 2. woaaah. super excited for KICK 2#BiggBoss19 #BiggBoss19GrandFinale pic.twitter.com/a7190TwGLs — Malti Keher (@MaltiChaharBase) December 7, 2025
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, २०१४ मध्ये ‘किक’ प्रदर्शित झाला. सलमान खानने या चित्रपटात देवी लाल सिंहची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रचंड हिट झाला. तेव्हापासून चाहते त्याच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘सिकंदर’च्या सेटवरून सलमान खानचा एक फोटो शेअर करत ‘किक २’ची घोषणा केली. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
किकचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
आता, एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर, सलमान खानने ‘किक २’ची घोषणा केली आहे. हा रवी तेजाच्या २००९ च्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ‘किक’मध्ये सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळालेल्या होत्या. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ४०२ कोटी रुपयांची कमाई केली. आणि चाहत्यांची पसंती मिळवली आहे.
कामाच्या बाबतीत, सलमान खानचा ‘द बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपटही सुरू आहे, ज्याचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. सेटवरून एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये चित्रांगदा सिंग देखील दिसली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा चाहते करत आहेत. तसेच आता अभिनेत्याचे भरपूर नवनवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.