
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सलमान खान लवकरच “बॅटल ऑफ गलवान” या चित्रपटात दिसणार आहे. तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि आता नुक्त्याच्या समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की अमिताभ बच्चन देखील सलमान खानच्या चित्रपटात सामील होणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की ते आगामी चित्रपटाचा भाग असू शकतात. हे चाहत्यांसाठी एक मोठे आश्चर्य ठरू शकते, कारण अमिताभ बच्चन यांना यापूर्वी कधीही केमिओ भूमिकेत पाहिलेले नाही.
कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?
दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी सेटवरील एका खास क्षणाचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. दोघांनी ज्या गंभीर पद्धतीने संवाद साधला त्यामुळे चाहत्यांना पडद्यामागे काहीतरी मोठे घडत आहे याची खात्री पटली आहे. कॅज्युअल पोशाखात अमिताभ बच्चन आणि सेटमागील गर्दी पाहून चाहते असा अंदाज लावत आहेत की बिग बी कदाचित आगामी चित्रपटाचा भाग असणार आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या फोटोला चाहते कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहेत.
Amitabh Bachchan on the sets of ‘Battle of Galwan’!
byu/Next_Antelope_420 inBollyBlindsNGossip
व्हायरल फोटोमागील सत्य काय आहे?
परंतु, या फोटोमागील सत्य कोणालाही माहिती नाही. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचा दावा आहे की अमिताभ बच्चन सलमान खानच्या चित्रपटात अचानक एन्ट्री करू शकतात. एका वापरकर्त्याने लिहिले की कदाचित दिग्दर्शक अपूर्व लाखिया बिग बींच्या सेटवर असतील आणि फक्त भेट देण्यासाठी ते तिथे पोहचले असतील. आता काय खरे आणि काय खोटे? हे सगळं चित्रपटामध्येच पाहायला मिळणार आहे.
गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ? अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार
‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन लष्करी संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भारतीय सैनिकांचे धैर्य आणि बलिदान दाखवले जाणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा चित्रपट बनवला जात आहे. सलमान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबूची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे, ज्यांनी ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’सारखे चित्रपट बनवले आहेत. चित्रांगदा सिंह, जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज हे कलाकार देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.