(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग
गायक अभिजीत सावंतला नुकतेच संगीत विश्वात २० वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि याचनिमित्त तो त्याच्या कामात आणखी वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता आगामी काळात तो गौतमीसोबत एखाद्या म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे का किंवा त्यांचा इतर कोणता प्रोजेक्ट येईल का, अशी चर्चा आहे. गौतमने अलिकडेच सोशल मीडियावर अभिजीतसोबत एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने ‘New’ असे लिहिले आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
तसेच नुकत्याच अलिकडच्या काळात गायक अभिजीत सावंतची नवनवीन गाणी रिलीज झाली आहेत. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्यामध्ये ‘प्रेमरंग सनेडो’ आणि ‘चाल तुरू तुरू’ या गाण्यांचा सामवेश आहे. या गाण्यांना जबरदस्त व्ह्युव्ज आणि लाइक्स देखील मिळाले आहेत. त्याआधी अभिजीत ‘बिग बॉस’ मराठी सिझन ५ मुळे चर्चेत आला होता. या पर्वाचा तो विजेता ठरला नाही, परंतु त्याच्या खेळाने सगळ्यांची मने जिंकली. अभिजीतच या पर्वाचा विजेता झाला पाहिजे, असे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले होते. या शोनंतर तो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या हिंदी कार्यक्रमात दिसला.
कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?
तर गौतमीबद्दल सांगायचे झाले तर, तिने हल्लीच स्टार प्रवाहच्या विविध कार्यक्रमांमध्ये लावणी नृत्य सादर करून इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय अलिकडेच ती ‘प्रेमाची गोष्ट 2’ मधील ‘दिसला गं बाई दिसला 2.0’ या गाण्यामध्ये थिरकताना दिसली. अनेकांनी जुन्या गाण्याची तोडमोड केल्याची टीका निर्मात्यांवर केलेली. याशिवाय ‘सोनचाफा’, ‘आई गोंधळाला ये’ ही गाणीही रीलिज झाले. गौतमीने ‘आतली बातमी फुटली’ सिनेमातही एक आयटम सॉन्ग केले. आणि आता गौतमी नवनवीन प्रोजेक्टचा भाग होताना दिसत आहे.






