(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कमळीचा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. साध्या पार्श्वभूमीतून आणि गावाकडून आलेली कमळी आज स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिने हार मानली नाही. तिचा आत्मविश्वास, धैर्य आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रेक्षकांच्या मनात ती खास स्थान मिळवत आहे. या आठवड्यातील भागांमध्ये कमळीच्या आयुष्यात काही नवे वळण येणार आहे, जे तिच्या संघर्षाला आणि नात्यांना अधिक घट्ट करणार आहे.
‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’, ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त विधानाने उडवली खळबळ
या मालिकेत येणाऱ्या आगामी भागात सरोज आणि ऋषी यांची अनपेक्षित भेट होणार आहे आणि योगायोगाने ती नयनताराच्या घरी राहायला लागली आहे. स्वयंपाकघरात मदत करू लागली आहे आणि हळूहळू घरातील लोकांच्या मनात जागा बनवू लागली आहे. सरोजच्या कामामुळे नयनतारा प्रभावित होते आणि आभार म्हणून ती कमळी आणि अन्नपूर्णा आज्जी सोबत संपूर्ण कुटुंबाला डिनरसाठी आमंत्रित करते. ही भेट पुढील घटनांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. डिनरच्या वेळी कमळी, सरोज आणि राजन एकत्र एकमेकांना टक्कर देणार आहेत. जेवणाच्या चवीवरून राजनला काहीतरी ओळखीचं जाणवतं, पण कोडे अजून सुटत असल्याचे दिसून येते. दरम्यान अनिका आणि नयनतारा हृषीसमोर डाव रचते, या सर्व घडामोडींमुळे घरात तणाव निर्माण होतो. आता घरात नक्की काय वातावरण निर्माण होते हे मालिकेच्या येणाऱ्या भागात दिसणार आहे.
हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग
दरम्यान, प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवा गोंधळ निर्माण होतो. अनिकाला पार्टीला बोलावलं जात नाही, त्यामुळे तिच्या मनात राग आहे. हा क्षण मालिकेतील एक निर्णायक टप्पा ठरतो कारण हाच तो क्षण आहे जेव्हा नयनतारा आणि कमळी पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. आपल्या आत्मसन्मानासाठी आणि प्रियजनांसाठी लढणारी कमळी आता नयनताराच्या विरोधात उभी राहते. पुढे जाऊन या संघर्षाचं रूप अधिक तीव्र होणार आहे. आता सरोज आणि कमळीची भेट होईल ? नयनतारा, कमळीला काय उत्तर देईल ? हे सगळं येणाऱ्या भागात दिसणार आहे जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.






