Bigg Boss 19: सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला ‘बिग बॉस १९’ (Bigg Boss 19) हा शो २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होणार आहे. शुक्रवारपासून सलमानने पहिल्या एपिसोडचं शूटिंग सुरू केलं असून, सेटवरील त्याचा पहिला लूक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात भाईजान जबरदस्त स्वॅगमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा वादग्रस्त रिॲलिटी शो १५ स्पर्धकांसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात भरपूर ड्रामा पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
‘बिग बॉस १९’ चा प्रीमियर २४ ऑगस्टला होणार असून, शूटिंग सुरू झाल्याने सलमानचा पहिला लूक समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान ऑल-ब्लॅक आऊटफिटमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. नेहमीप्रमाणेच तो दमदार दिसत असून, त्याचे चाहते त्याला ‘वीकेंड का वार’मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
‘बिग बॉस १९’ च्या शूटिंगसोबतच सलमान खान अपूर्व लाखियाच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचेही शूटिंग करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस १९’ ची थीम यंदा राजकारण आहे, ज्याची झलक प्रोमोमध्ये दिसली होती. या सीझनची थीम ‘घरवालों की सरकार!’ असून, घरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या बदलासाठी स्पर्धकच जबाबदार असतील.
‘बिग बॉस’चा हा सीझन जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर पाहता येईल. जिओ सिनेमावर रात्री ९ वाजता आणि कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता हा शो सुरू होईल. तसेच, ओटीटीवर हा शो २४/७ उपलब्ध असेल, असे म्हटले जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १५ स्पर्धक सहभागी होणार असून, हा ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात मोठा सीझन ठरू शकतो.