Salman Khan (Photo Credit- X)
Bigg Boss 19: १९व्या सीझनचा ‘बिग बॉस’ लवकरच भेटीला येणार आहे. २ दिवसांनी म्हणजेच २४ ऑगस्टला ‘बिग बॉस १९’चा ग्रँड प्रीमियर होणार असून प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. यंदाच्या सीझनमध्ये राजकारण्यांचीही एंट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानच्या या शोमध्ये कोणते राजकारणी सहभागी होणार आहेत? जाणून घेऊया याबद्दल…
‘बिग बॉस १९’ बद्दल ‘biggboss.tazakhabar’ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लालू यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मार्लेना ‘बिग बॉस १९’ मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे दोघे स्पर्धक म्हणून दिसतील की पाहुणे म्हणून त्यांची एंट्री होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
दरम्यान, नुकतंच ‘बिग बॉस १९’ च्या सेटवर एका राजकारण्याची गाडी दिसली होती, पण ती नेमकी कोणाची होती, हे स्पष्ट झालं नव्हतं. आता सलमान खानच्या शोमध्ये कोणते राजकारणी सहभागी होणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेज प्रताप आणि आतिशी या दोघांचे राजकीय जीवन नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता हे दोघे लोकप्रिय आणि वादग्रस्त असलेल्या ‘बिग बॉस’ शोमध्ये दिसणार आहेत.
तसेच, अशी बातमी देखील समजली आहे की प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन देखील सलमान खानच्या लोकप्रिय शोमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव देखील समोर ले आहे. तसेच, अभिनेत्याने शोने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. जर असे झाले तर चाहते खरोखर आनंदी होतील आणि शोचे उर्वरित स्पर्धक अडचणीत येतील. आता बॉक्सर माइक टायसन सहभागी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘बिग बॉस १९’चा प्रीमियर २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता शोमध्ये काय काय होतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.