
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी, समांथा रूथ प्रभूने एक नवीन जीवन सुरू केले आहे. अभिनेत्रीने आज सोमवार, १ डिसेंबर रोजी राज निदिमोरूशी लग्न केले. सामंथाने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे, ज्यामध्ये ती एका चमकदार लाल साडीत वधूच्या सजलेल्या अवतारात दिसत आहे.
चाहत्यांसोबत शेअर केले फोटो
आज, १ डिसेंबर, सामंथा रूथच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन आला. तिने तिच्या आयुष्यात एका नवीन अध्यायात सुरु केला आहे. अभिनेत्रीने एका खाजगी समारंभात राजशी लग्न केले आहे. समांथा आणि राज निदिमोरू बऱ्याच काळापासून डेटिंग करत होते. आणि आता अखेर या दोघांनी लग्न केले आहे. सामंथाने इन्स्टाग्रामवर स्वतःच लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे, तसेच कॅप्शनमध्ये तिने “१.१२.२०२५” ही लग्नाची तारीख देखील दिली आहे.
छोट्या मंदिरात विधीसह केले लग्न
शेअर केलेल्या फोटोंमध्ये समंथा आणि राज लग्नाच्या विधी पूर्ण करताना दिसत आहेत. जोडप्याने मंदिरात सर्व विधींसह लग्न केले. एका फोटोमध्ये त्यांनी साक्षीदार म्हणून वापरलेली अग्नी हात धरून दाखवली आहे. परंतु, लग्नाचे फोटो अस्पष्ट दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये, राज त्याच्या वधू सामंथाला अंगठी घालताना दिसत आहे.
स्मृती मानधनासोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाला पलाश, चेहऱ्यावर पश्चाताप?
सेलिब्रिटींनी जोडप्याचे केले अभिनंदन
सामंथाने या खास प्रसंगासाठी चमकदार लाल साडी नेसली होती. तिने सोन्याच्या दागिन्यांनी तिचा लूक पूर्ण केला. केसांमध्ये गजरा घालून, ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहते या जोडप्याच्या लग्नाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि शुभेच्छा दिल्या आहेत. सामंथाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले. परंतु, २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने नंतर गेल्या वर्षी अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले. तसेच सांगायचे झाले तर आता हे राज निदिमोरूचे दुसरे लग्न देखील आहे. आणि आता सामंथानेही दुसरे लग्न केले आहे.