(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
‘देवमाणूस- मधला अध्याय’ मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली. आर्या हा संपूर्ण प्रसंग अजीतला सांगते, आणि अजीत तिला बँकेतून पैसे काढण्यास प्रवृत्त करतो. मात्र, त्या व्यवहारासाठी साकेतची सही आवश्यक असल्याने तो नकार देतो. त्यामुळे त्यांच्यात तीव्र वाद निर्माण होतो. वाद वाढत असतानाच आर्या भावनिकदृष्ट्या अजीतच्या अधिक जवळ येऊ लागलेय. हे पाहून लालीच्या मनात मत्सर निर्माण होतो.
दरम्यान, अजीत आर्याला भेटण्याचे प्रयत्न करत असताना साकेतविरुद्ध खोट्या अफवा पसरवण्याचे षड्यंत्रही आखतो, ज्यामुळे जामकरच्या मनातला संशय अधिक बळावणार आहे. अजीतच्या अफवांमुळे जामकर रागाने साकेतला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जातो. त्यांच्या मागोमाग अजीतही निघतो. एका निर्मनुष्य ठिकाणी जामकर साकेतला ठेवतो. अजीत साकेतला सामोरे जातो, ज्यातून त्यांच्या दोघांत संघर्ष होतो. रागाच्या भरात अजीत त्याचा खून करून त्याचे शरीर नदीत फेकून देतो. पण त्याचवेळी शामल अजीतला साकेतचा खून करताना पाहते आणि भीतीने जंगलात पळते. तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्याच जंगलात लालीने अजितला अडकण्यासाठी जाळं लावल आहे.
‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही झी मराठीवरील एक रहस्यमय क्राईम-थ्रिलर मालिका आहे ज्यात ग्रामीण भागातील गुन्हेगारी, सत्तेचे खेळ, फसवणूक आणि रहस्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या सिझनमध्ये अजीत, आर्या, साकेत, जामकर आणि लाली यांच्यातील नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आर्या-साकेतमधील वाद, अजीतचे कटकारस्थान, साकेतवर वाढत चाललेला संशय, आणि शेवटी अजीतकडून झालेला साकेतचा खून यामुळे मालिकेत धक्कादायक वळण निर्माण झाले आहे. या घटनांचा साक्षीदार बनलेली शामल जंगलात पळून जाते, जिथे तिच्या जीवाला धोका निर्माण होतो; याच वेळी लालीने अजीतला अडकवण्यासाठी जाळं लावलेलं असतं. सततचे ट्विस्ट, ताणतणाव, रहस्यमय पात्रांची खोली आणि गुन्ह्याचे अनपेक्षित पैलू यामुळे ‘देवमाणूस – मधला अध्याय’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अनुभव देत आहे.






