Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हत्तीला पाणी पाजल्याबद्दल सिद्धार्थ झाला चांगलाच ट्रोल, ‘परम सुंदरी’च्या सेटवरील BTS व्हिडीओ व्हायरल

अलिकडेच परम सुंदरीच्या सेटवरून बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा एक बीटीएस व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हत्तीला पाणी देताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच सिद्धार्थला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 01, 2025 | 12:32 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘परम सुंदरी’च्या सेटवरील BTS व्हिडीओ व्हायरल
  • सिद्धार्थला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या त्याच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरसोबतचा त्याचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण याच दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ समोर आला ज्यामुळे सिद्धार्थच्या चाहत्यांमध्ये चर्चा आणि वाद दोन्ही निर्माण झाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सिद्धार्थने हत्तीला दिले पाणी
व्हिडिओमध्ये अभिनेता हत्तीला पाणी देताना दिसत आहे. सिद्धार्थ सेटवर मजा करताना दिसला, पण त्याची पाणी देण्याची पद्धत काही लोकांना आवडली नाही. हे प्रकरण इतके वाढले की सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ सामान्य दिसत आहे पण काही लोकांना तो आवडला नाही. काही चाहत्यांची मने या व्हिडीओमुले दुखावली गेली आहे. आता या व्हिडीओ मध्ये नक्की असे काय आहे ज्यामुळे लोकांची मने दुखावली गेली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Bigg Boss 19 : ‘Room Of Faith’ म्हणजे काय? आता बिग बॉसच्या घरात असे होणार नाॅमिनेशन, या सदस्यांवर टांगती तलवार

सिद्धार्थला का ट्रोल करण्यात आले?
व्हिडिओमध्ये, अभिनेता हातात एक ग्लास धरलेला दिसत आहे. प्रथम तो स्वतः त्या ग्लासमधून पाणी पितो आणि नंतर तेच पाणी हत्तीला देतो. या दरम्यान, तो विनोदाने ‘चीअर्स’ म्हणतो आणि हत्तीला ‘गुड गर्ल’ असेही म्हणतो. त्यानंतर लगेचच या व्हिडीओवर आता कंमेंटचा वर्षाव होत आहे. काही चाहते या व्हिडीओला पसंत करत आहेत तर काहींना हा व्हिडीओ आवडला नाही आहे.

 

हत्तीला उष्टावलेले पाणी देण्यात आले
खरं तर भारतात हत्तीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच अनेक वापरकर्त्यांनी सिद्धार्थच्या या कृतीला देवाचा अनादर म्हटले. सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याने लिहिले – ‘हत्ती हे गणपतीचे रूप आहे, तुम्ही त्याला उष्टावलेले पाणी कसे देऊ शकता?’ दुसऱ्याने संतप्त इमोजी बनवताना कमेंट केली – ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे, हे देवाचा अनादर आहे.’ अनेकांनी याला ‘अज्ञान’ म्हटले, तर काहींनी म्हटले की एक मोठा स्टार असल्याने त्याने त्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तसेच, अनेक चाहत्यांनी त्याचा बचावही केला आहे.

Bigg Boss 19: कुनिका नंतर, आता ‘हा’ स्पर्धक घरावर करणार राज्य; घरातील सदस्यांनी कोणाला बनवले कॅप्टन?

‘परम सुंदरी’ चित्रपटाचे कलेक्शन
‘परम सुंदरी’ हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी या चित्रपटाने ९ कोटी रुपये कमावले. रविवारी या चित्रपटाने १०.४५ कोटी रुपये कमावले. ‘परम सुंदरी’ने आतापर्यंत २६.९५ कोटी रुपये कमावले आहेत. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, संजय कपूर, मनजोत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांसारखे कलाकार काम करत आहेत.

Web Title: Sidharth malhotra elephant water video viral controversy actor gets trolled for this reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय
1

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप
2

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज
3

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा पुन्हा एकत्र; ‘उडता तीर’मधून देशभक्तीचा नवा अंदाज
4

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा पुन्हा एकत्र; ‘उडता तीर’मधून देशभक्तीचा नवा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.